शिरपूर तालुक्यातील तोंदे गावातील विविध सेवा सहकारी संस्थेच्या सभासदांच्या नावाने धुळे-नंदुरबार जिल्हा बँकेतून बनावट कागदपत्र आणि स्वाक्षरी करून तब्बल ४२ लाख ९५ हजार रूपयांचा अपहार केल्याची तक्रार पोलिसात दाखल करण्यात आली आहे एक एप्रिल २०१० ते ३१ मार्च २०१५ या कालावधीत संशयित सुरेश पाटील आणि श्रीराम पावरा यांनी धुळे-नंदुरबार जिल्हा बँकेतून तोंदे विविध सेवा सहकारी संस्थेतील ८६ सभासदांच्या नावाने कर्ज प्रकरणे तयार केली. कर्ज लागत असल्याचे भासवून बनावट सात-बारा, कागदपत्रे आणि तक्रारदारासह इतरांचीही स्वाक्षरी करून बँकेतून तब्बल ४२ लाख ९५ हजार ४८६ रुपयांचा अपहार केल्याची तक्रार शिरपूर पोलीस ठाण्यात दिलीप चौधरी यांनी दाखल केली. पोलिसांनी पाटील आणि पावरा या दोघांविरूध्द फसवणुकीचा आणि अपहाराचा गुन्हा दाखल केला आहे.