News Flash

महाराष्ट्रात दिवसभरात ४ हजार ९२२ नव्या करोना रुग्णांचे निदान, ९५ मृत्यूंची नोंद

दिवसभरात ५ हजारांपेक्षा जास्त रुग्णांना डिस्चार्ज

संग्रहीत

महाराष्ट्रात दिवसभरात ४ हजार ९२२ नवे करोना रुग्ण पॉझिटिव्ह आढळले आहेत. तर मागील २४ तासांमध्ये ९५ मृत्यूंची नोंद झाली आहे. मागील २४ तासात ५ हजार ८३४ रुग्णांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. आत्तापर्यंत एकूण १७ लाख १५ हजार ८८४ रुग्णांनी करोनावर मात केली आहे.सध्या राज्यातील मृत्यूदर २.५८ टक्के इतका झाला आहे. आजपर्यंत तपासण्यात आलेल्या १ कोटी १२ लाख ५ हजार ११८ प्रयोगशाळा नमुन्यांपैकी १८ लाख ४७ हजार ५०९ नमुने पॉझिटिव्ह आले आहेत. महाराष्ट्र शासनाच्या आरोग्य विभागाने ही माहिती दिली आहे.

सध्या राज्यात ५ लाख ६० हजार ६८५ व्यक्ती होम क्वारंटाइन आहेत. तर ५ हजार ८५५ व्यक्ती संस्थात्मक क्वारंटाइन आहेत. राज्यात आज घडीला ८२ हजार ८४९ अॅक्टिव्ह रुग्ण आहेत. आज राज्यात ४ हजार ९२२ नव्या करोना रुग्णांची नोंद झाली आहे. त्यामुळे राज्यातील करोना रुग्णांची एकूण संख्या १८ लाख ४७ हजार ५०९ इतकी झाली आहे. आज नोंद झालेल्या ९५ मृत्यूंपैकी ४४ मृत्यू हे मागील ४८ तासातले आहेत. तर ११ मृत्यू हे मागील आठवड्यातले आहेत. उर्वरित ४० मृत्यू हे एक आठवड्यापूर्वीच्या काळातील आहेत अशीही माहिती आरोग्य विभागाने दिली आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on December 5, 2020 8:20 pm

Web Title: diagnosis of 4 thousand 922 new corona patients in a day in maharashtra last 24 hours scj 81
टॅग : Coronavirus
Next Stories
1 ‘ग्लोबल टीचर’ रणजीत डिसलेंना राज्यपाल नियुक्त आमदार करण्यासाठी भाजपा करणार शिफारस
2 “वर्षपूर्तीचा आनंद संपायच्या आतच काँग्रेस नेत्यांचे इशारे सुरू”
3 बंदी असूनही पुरंदरमध्ये जात पंचायत भरवली, सहा जणांवर गुन्हा दाखल
Just Now!
X