25 November 2020

News Flash

‘भाजपाच्या महामेळाव्यासाठी नीरव मोदी, विजय मल्ल्याने पैसे पुरवले का?’

भाजपाच्या महामेळाव्यासाठी ५० कोटींचा खर्च झाला. हा पैसा काय नीरव मोदी आणि विजय मल्ल्याने दिला का? असा प्रश्न विचारत माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांनी भाजपावर

अशोक चव्हाण

भाजपाच्या महामेळाव्यासाठी ५० कोटींचा खर्च झाला. हा पैसा काय नीरव मोदी आणि विजय मल्ल्याने दिला का? असा प्रश्न विचारत माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांनी भाजपावर निशाणा साधला. बुलडाण्यातील शेगावमध्ये झालेल्या सभेत ते बोलत होते. काँग्रेसचे जिल्हा स्तरीय शिबीर आयोजित करण्यात आले होते. त्यानंतर झालेल्या पत्रकार परिषदेत अशोक चव्हाण यांनी भाजपावर टीकेचे ताशेरे ओढले.

आगामी निवडणुका डोळ्यासमोर ठेवून भाजपाने महामेळावा घेतला. मात्र या महामेळाव्यासाठी करण्यात आलेला ५० कोटींचा खर्च कुठून आणला? शेतकऱ्यांच्या आत्महत्या वाढलेल्या असताना तुम्हाला त्या शेतकऱ्यांचे अश्रू पुसण्यासाठी पैसे नाहीत. राज्यातल्या आत्महत्याग्रस्त शेतकऱ्यांच्या कुटुंबीयांना मदत करण्यासाठी पैसे नाहीत. मग महामेळाव्यासाठी पैसे आले कुठून? कर्जबुडव्या नीरव मोदी आणि विजय मल्ल्या या दोघांनी तुम्हाला पैसे पुरवलेत का? असा खोचक प्रश्न विचारत अशोक चव्हाण यांनी भाजपावर टीका केली.

राज्यातल्या २१ मंत्र्यांवर घोटाळ्याचे आरोप आहेत. घोटाळेबाज मंत्र्यांच्या मांडीला मांडी लावून बसलेले भाजपा अध्यक्ष अमित शाह हे पारदर्शकतेच्या गोष्टी करत आहेत हे हास्यास्पद आहे. भाजपाने आज वर्धापन दिनाचा उत्साह साजरा केला की १३ हजार शेतकऱ्यांच्या मरणाचा असाही प्रश्न अशोक चव्हाण यांनी विचारला आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on April 6, 2018 10:12 pm

Web Title: did neerav modi and vijay mallya provide money for bjp foundation day asks ashok chavan
Next Stories
1 अल्पवयीन मुलीवर अत्याचार, चार जणांना जन्मठेपेची शिक्षा
2 अन् सरणावर ठेवण्यापूर्वी मृत जिवंत निघाला…!
3 भाजपाच्या ‘विराट’ शक्तिप्रदर्शनाच्या मुंबईतील महामेळाव्यात कोण काय म्हणालं….
Just Now!
X