29 May 2020

News Flash

कोल्हापूरला दगावलेला रूग्ण करोनाचा नाही

काही वृत्त वाहिन्यांवर हा करोनग्रस्त रुग्ण असल्याचे वृत्त झळकत आहे.

(संग्रहित छायाचित्र)

कोल्हापूरमध्ये एक करोनाग्रस्त रुग्ण दगावला असल्याची बातमी काही वृत्तवाहिन्यांवर दाखविली जात आहे. मात्र, हा करोनाचा रुग्ण नव्हता. संबंधित रुग्ण टेम्पो चालक होता, त्याने कधी परदेश प्रवासही केलेला नाही, असे स्पष्टीकरण राज्य साथरोग नियंत्रण अधिकारी डॉ. प्रदीप आवटे यांनी दिले आहे.

कोल्हापूरच्या सीपीआर रुग्णालयात रविवारी संध्याकाळी एका करोनाग्रस्त ६८ वर्षीय वृद्ध व्यक्तीचा मृत्यू झाल्याचे वृत्त काही माध्यमांमधून प्रसारित झाले आहे. या व्यक्तीच्या स्वॅबचे नमुने पुण्यातील राष्ट्रीय विषाणू तपासणी प्रयोगशाळेत पाठवण्यात आले आहेत. दरम्यान, हा करोनाचा रुग्ण नव्हता. संबंधित रुग्ण टेम्पो चालक होता, त्याने कधी परदेश प्रवासही केलेला नाही, अशी माहिती राज्य साथरोग नियंत्रण अधिकारी डॉ. प्रदीप आवटे यांनी दिली आहे.

कोल्हापूरात मृत्यू झालेल्या या व्यक्तीला श्वसनासंबंधीचा आजार होता. त्यामुळे त्याला करोनाची लागण झाल्याची चर्चा सुरु झाली होती. मात्र, आता हा रुग्ण करोनाग्रस्त नव्हता हे स्पष्ट झाले आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on March 16, 2020 9:10 am

Web Title: died patient in kolhapur had not been corona virus infected aau 85
Next Stories
1 स्वस्त धान्य दुकानांमधून अन्य किराणा माल घेण्याची सक्ती
2 सामान्य यंत्रमागधारक बेदखल!
3 Coronavirus: जायचं होतं घरी पण वाट पत्करावी लागली रुग्णालयाची!
Just Now!
X