डिझेलच्या दराने गुरुवारी नवा उच्चांक गाठला असून गुरुवारी मुंबईत डिझेलच्या दराने प्रति लिटर ७४ रुपये २९ पैसे इतका दर गाठला. तर पेट्रोलच्या दरातही वाढ झाली सलग पाचव्या दिवशी तेल कंपन्यांनी इंधनाच्या दरात वाढ केली आहे.

आंतरराष्ट्रीय स्तरावर कच्चा तेलाच्या किंमतीत वाढ होत असून याचा फटका भारताला बसत आहे. गुरुवारी मुंबईत डिझेल १९ पैशांनी महागले. डिझेलचे दर प्रति लिटर ७४. २९ रुपयांवर पोहोचले आहेत. तर पेट्रोलचे दरही १२ पैशांनी वाढले आहे. मुंबईत पेट्रोलचे दर प्रति लिटर ८५ रुपये ७७ पैशांवर पोहोचले आहे. कोलकाता, दिल्ली, चेन्नई या महानगरांमधील इंधनाच्या दरातही वाढ झाली आहे. तेल भडक्याने महागाई वाढण्याची शक्यता आहे.

राज्यातील प्रमुख शहरांमधील दर (सर्व दर प्रति लिटरनुसार)

> पुणे<br />पेट्रोल – ८५ रुपये ५८ पैसे
डिझेल – ७२ रुपये ९८ पैसे

> औरंगाबाद<br />पेट्रोल – ८६ रुपये ८१ पैसे
डिझेल – ७५ रुपये ३५ पैसे

> नागपूर<br />पेट्रोल – ८५ रुपये ६५ पैसे
डिझेल – ७३ रुपये ०७ पैसे