News Flash

डॉ. प्रज्ञा सरवदेंसमोर रेड्डी विरोधात पुराव्यांची जंत्री

दीपाली चव्हाण आत्महत्या प्रकरण

दीपाली चव्हाण आत्महत्या प्रकरण

अमरावती : हरिसाल येथील वनपरिक्षेत्र अधिकारी दीपाली चव्हाण आत्महत्या प्रकरणी निलंबित अपर मुख्य वनसंरक्षक एम. एस. रेड्डी यांच्या भूमिके संदर्भात शासनाने तपासासाठी नियुक्त केलेल्या आयपीएस अधिकारी  डॉ. प्रज्ञा सरवदे यांची भाजपचे प्रदेश प्रवक्ते शिवराय कुळकर्णी यांनी भेट घेऊन रेड्डी यांच्या विरोधात असलेले सबळ पुरावे त्यांच्यासमोर मांडले. त्यांनी बुधवारी डॉ. प्रज्ञा सरवदे यांची येथे भेट घेतली.

आत्महत्या प्रकरणात एम.एस. रेड्डी दोषी नव्हते तर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडेच असलेल्या वनखात्याने रेड्डी यांची २६ मार्चला तडकाफडकी बदली का केली? दीपाली चव्हाण यांनी वेळोवेळी अवगत केले असल्याचे देखील या पत्रात स्पष्ट नमूद केले आहे. दीपाली यांच्या मृत्यूपूर्व पत्रामध्ये देखील रेड्डी काहीच कारवाई करत नव्हते, असे स्पष्टपणे म्हटले आहे. मग रेड्डीवर थातूरमातूर स्वरूपाची केवळ बदलीची कारवाई का? रेड्डी यांना सहआरोपी का करण्यात आले नाही? जिल्हा पोलीस अधिकारी जाहीरपणे रेड्डीला क्लिन चिट का देत होते? रेड्डीचे तात्काळ निलंबन का करण्यात आले नाही, असे सवाल शिवराय कु ळकर्णी यांनी उपस्थित के ले आहेत.

दीपाली यांनी तीन पत्रे लिहिली आहेत. रेड्डी यांना लिहिलेल्या पत्रात त्यांना वारंवार तक्रारी केल्या. रेड्डी यांचाच शिवकुमारला वरदहस्त आहे, रेड्डींना रेकॉर्डिग ऐकवले, असे स्पष्ट उल्लेख आहेत. दीपालीने पतीला लिहिलेल्या पत्रात देखील रेड्डी यांना वारंवार सांगूनही त्रास कमी न झाल्याचे स्पष्ट नमूद केले आहे. आईला लिहिलेल्या पत्रात, रेड्डी यांना सर्व सांगूनही उपयोग झाला नसल्याचे व टोकाचा त्रास होत असल्याचे दीपालीने नमूद केले आहे. पत्रातील तीव्र भावना पाहता रेड्डी यात निश्चितच कायद्याने सहआरोपी करायला पाहिजे. मात्र, वरिष्ठ अधिकाऱ्यांनी रेड्डीला पाठीशी घातल्यामुळे त्यांच्यावर अद्यापही ठोस कारवाई करण्यात आली नसल्याचे शिवराय कुळकर्णी यांनी तपास अधिकाऱ्यांना सांगितले.

एम.एस. रेड्डी यांच्या समर्थनार्थ एक वन कर्मचाऱ्यांची चमू निवेदन घेऊन लोकप्रतिनिधी आणि सरकारी अधिकाऱ्यांच्या दारोदार फिरली. हे कृत्य देखील शासकीय नियमांची पायमल्ली करणारे आहे. महाराष्ट्र नागरी सेवा वर्तणूक नियम १९७९ कलम २९ व ३० चा भंग आहे. रेड्डी यांना अचलपूर न्यायालयाने अटकपूर्व जामीन नाकारताना त्यांच्या कृतीवर गंभीर ताशेरे ओढले आहेत.

या प्रकरणात रेड्डी सरकारी दस्ताऐवज फेरफार करू शकतात किंवा पुरावे प्रभावित करू शकतात. तरीही उच्चपदस्थांचा रेड्डीला वाचवण्याचा अट्टाहास का, असा प्रश्न देखील शिवराय कुळकर्णी यांनी यावेळी उपस्थित केला. ही चौकशी समिती दीपालीला न्याय देईल, अशी अपेक्षा देखील त्यांनी व्यक्त केली आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on April 29, 2021 1:18 am

Web Title: dipali chavan suicide bjp state spokesperson presented strong evidence against reddy zws 70
Next Stories
1 वर्धेतील अल्पवयीन मुलीचा बालविवाह यवतमाळात रोखला
2 यवतमाळ जिल्ह्यातील मृत्यू, रुग्णदर कमी करण्यासाठी प्रयत्न करा
3 यवतमाळात खासगी कोविड रुग्णालयात तोडफोड
Just Now!
X