20 November 2017

News Flash

शेतकऱ्यांचा माल आता थेट बाजारात

३५१ शेतकरी गट आणि ८ कंपन्यांची स्थापना

प्रतिनिधी, अलिबाग | Updated: March 21, 2017 1:38 AM

३५१ शेतकरी गट आणि ८ कंपन्यांची स्थापना

रायगड जिल्ह्य़ात शेतकऱ्यांचे गट तसेच कंपन्या स्थापन करण्यात आल्या असून त्यांच्या माध्यमातून जिल्ह्य़ातील शेतकऱ्यांनी पिकवलेला शेतमाल थेट बाजारात आणला जाणार आहे. त्यामुळे शेतकरी आणि ग्राहक यांच्यातील दलालांची साखळी तुटून शेतकऱ्यांची होणारी लुटमार थांबणार आहे.

कृषी तंत्रज्ञान व्यवस्थापन यंत्रणा (आत्मा) रायगड यांच्या वतीने जागतिक बँक अर्थसाहाय्य महाराष्ट्र स्पर्धाक्षम कृषिविकास प्रकल्प रायगड जिल्ह्य़ात राबवला जात आहे. जिल्ह्य़ात शेतकऱ्यांचे ३५१ शेतकरी गट स्थापन केले असून ८ शेतकरी उत्पादक कंपन्या रायगड जिल्ह्य़ामध्ये स्थापन करण्यात आल्या आहेत. जिल्ह्य़ात अलिबाग, पेण, पनवेल, उरण या भागांतील शेतकरी नियमित भाताच्या उत्पनाबरोबरच विविध प्रकारचा भाजीपाला पिकवत असतात. हा भाजीपाला दलाल मंडळी मनमानी भावात खरेदी करतात. त्यात शेतकऱ्यांना योग्य मोबदला मिळत नाही. भाजीपाला नवी मुंबईच्या बाजारात विक्रीसाठी आणणे शेतकऱ्यांना परवडत नाही. हे लक्षात घेऊन शेतकऱ्यांना आत्मा अंतर्गत एकत्र करण्यात आले आहे.

या पाश्र्वभूमीवर जिल्हास्तरीय खरेदीदार-विक्रेता संमेलनाचे आयोजन मार्केट यार्ड, वाशी, नवी मुंबई येथे आयोजित करण्यात आले होते. यामध्ये रायगड जिल्ह्य़ातील शेतकरी व मुंबई, नवी मुंबई, ठाणे येथील खरेदीदार उपस्थित होते. शेतकऱ्यांनी चांगल्या प्रकारचा शेतमाल उत्पादित करावा जेणेकरून खरेदीदार जास्तीत जास्त शेतमाल खरेदी करतील व त्यांच्या शेतमालाला चांगला भाव मिळेल, असे कोकण विभागीय कृषी सहसंचालक अशोक लोखंडे यांनी सांगितले.

First Published on March 21, 2017 1:38 am

Web Title: direct marketing by farmers