News Flash

महाराष्ट्र ग्रंथ भांडारचे संचालक, निवृत्त प्रा. शशिकांत कुलकर्णी यांचे निधन

आचार्य विनोबा भावे व सर्वोदयी विचारसरणीचा प्रभाव होता

कोल्हापूर येथील महाराष्ट्र ग्रंथ भांडारचे संचालक, निवृत्त प्राध्यापक प्रा. शशिकांत कुलकर्णी यांचे गुरुवारी दुपारी निधन झाले. ते ७८ वर्षांचे होते.

महाराष्ट्र ग्रंथ भांडार ही कोल्हापुरातील एक जुनी नामवंत प्रकाशन संस्था होती. सेवा मुद्रणालय नावाचे त्यांचे मुद्रणालयही होते. महाद्वार रोडवरील त्यांचे पुस्तकांचे दुकान म्हणजे कोणतेही धार्मिक पुस्तक हमखास मिळण्याचे ठिकाण मानले जाते. विशेषत: गीता प्रेसची पुस्तके कोल्हापुरात त्यांच्याकडेच मिळत. शशिकांत कुलकर्णी यांच्यावर आचार्य विनोबा भावे व सर्वोदयी विचारसरणीचा प्रभाव होता. विवेकानंद महाविद्यालयात ते  तर्कशास्त्र विषय शिकवत. अनेक विषयांचा त्यांचा व्यासंग होता. त्यांचा स्वतःचा मोठा ग्रंथसंग्रह होता. नवीन प्रकाशित झालेल्या पुस्तकांची संबंधित वाचकांना माहितीपूर्ण शिफारस करणे, हा त्यांचा छंद होता. ते क्वचित पण दर्जेदार लिखाण करीत लिहित. त्यांच्या पश्चात  पत्नी कवयित्री निलांबरी  कुलकर्णी, दोन मुले, सुना, नातवंडे असा परिवार आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on April 16, 2020 5:43 pm

Web Title: director of maharashtra granth bhandar retired prof shashikant kulkarni dies msr 87
Next Stories
1 धक्कादायक: करोनाबाधिताकडून रुग्णवाहिका चालकास मारहाण, अंगावरही थुंकला
2 Coronavirus : औरंगाबादकरांच्या चिंतेत वाढ, आणखी तीन जण करोनाबाधित
3 …संविधानाला श्रद्धांजली वाहण्याची तयारी नसेल ना?; पंतप्रधान, राष्ट्रपतींच्या ट्विटवर राष्ट्रवादीच्या नेत्याचा सवाल
Just Now!
X