22 October 2020

News Flash

कोयना धरणातून साडेदहा हजार क्युसेक पाण्याचा विसर्ग

धरणात ८०.७६ टीएमसी उपयुक्त जलसाठा

कोयना धरण ८१ टक्के धरण भरले असून, धरणात ८० .७६ टीएमसी उपयुक्त जलसाठा आहे.आज सकाळी कोयना धरणाचे सहा वक्रदरवाजे १ फूट ९ इंच उचलून सांडव्या वरून १० हजार ४१० क्युसेक पाणी सोडण्यात आले.

कोयना धरण पाणलोट क्षेत्रात आज सकाळी ८ वाजेपर्यंत कोयना येथे १३६ नवजा येथे ८२ व महाबळेश्वर येथे १५६मिमी पावसाची नोंद झाली आहे.कोयना धरणाच्या सांडव्या वरून ९ हजार ३६० क्युसेक व धरण पायथा विजगृहमधून १ हजार ५० क्युसेक असा एकूण १० हजार ४१० क्युसेक पाण्याचा विसर्ग कोयना नदीपात्रात सुरू आहे.

सातारा जिल्ह्यातील इतर प्रमुख धरणातील उपयुक्त जलसाठा टीएमसीमध्ये व टक्केवारी कंसात पुढील प्रमाणे-

धोम – ८.३९ (७१.७९ टक्के), धोम-बलकवडी- ३.५८ (९०.३९ टक्के), कण्हेर – ८.४५ (८८.०५ टक्के), उरमोडी – ९.१६(९४.८७ टक्के), तारळी- ४.८५ (८६.०३ टक्के), निरा-देवघर – ७.८० (६६.५५ टक्के), भाटघर-१८.६७ (७९.४३ टक्के), वीर – ९.२९ (९८.८१ टक्के)

सद्यस्थितीत सातारा जिल्ह्यातील प्रमुख धरणे ९०टक्के भरलेली आहेत. तसेच हवामान खात्याने पुढील दोन दिवसात अतिवृष्टीचा इशारा दिला आहे. प्रमुख धरणातून कोयना उरमोडी ,तारळी, कण्हेर, वीर,धोम बलकवडी यामधून पाण्याचा विसर्ग करण्यात येत आहे आणि तो वाढण्याची शक्यता असल्याने नदीकाठच्या गावातील नागरिकांनी सतर्क राहण्याच्या सुचना करण्यात आल्या आहेत. तसेच, नदीपात्रात कोणत्याही परिस्थितीत प्रवेश करू नये अथवा पोहण्यासाठी जाऊ नये, पुलावरून आठ्वसओढ्यावरून पाणी वाहत असेल तर पूल ओलांडू नये, घाटातून प्रवास टाळावा व दरड प्रवण क्षेत्रात जाऊ नये, सर्व नागरिकांनी पिण्याचे पाणी उकळूनच प्यावे, जनावरांना नदी नाल्यापासून सुरक्षित अंतरावर ठेवावे असे अवाहन जिल्हा नियंत्रण केंद्र सातारा यांनी केले आहे.

कोयना धरण परिसरात ३.१ रिस्टर स्केलचा भूकंप –

कोयना धरण परिसरात आज (शनिवार) सकाळी १०.२२ मिनिटांनी सौम्य भूकंपाचा धक्का जाणवला. त्याची पातळी ३.१ रिस्टर स्केल होती. या भूकंपाचा केंद्रबिंदू वारणा खोऱ्यात चिखली गावाच्या ईशान्येस १० किमी अंतरावर ८ किमी खोलीवर होता .कोयना धरणापासून याचे अंतर  १३.६० किमी आहे.या भूकंपाच्या धक्क्याने कोणत्याही नुकसानीची नोंद नाही.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on August 15, 2020 3:33 pm

Web Title: discharge of ten and a half thousand cusecs of water from koyna dam msr 87
Next Stories
1 राज्यात उत्तम आरोग्य सुविधा पुरवण्यास सर्वोच्च प्राधान्य : मुख्यमंत्री
2 स्वातंत्र्य दिनी साताऱ्यात खळबळजनक घटना; पोलिसांमुळे मोठा अनर्थ टळला, अन्यथा…
3 स्वातंत्र्यदिनानिमित्त श्री विठ्ठल-रुक्मिणी मातेला तिरंगी फुलांची सजावट
Just Now!
X