26 May 2020

News Flash

मोकाट कुत्र्यांनी चितेतून बाहेर काढलेल्या मृतदेहावर अंत्यसंस्कार

नालेगाव अमरधाम स्मशानभूमीत मृतदेहाची विटंबना

नालेगाव येथील अमरधाम स्मशानभूमीत अर्धवट जळालेला मृतदेह मोकाट कु त्र्यांनी चितेतून बाहेर काढला होता. या मृतदेहावर नवग्रह मित्रमंडळाचे अमोल बनकर व त्यांच्या कार्यकर्त्यांनी विधिवत अंत्यसंस्कार केले.

नालेगाव अमरधाम स्मशानभूमीत मृतदेहाची विटंबना

नगर : नालेगाव येथील स्मशानभूमीतून अर्धवट जळालेला मृतदेह मोकाट कु त्र्यांनी चितेतून काढून तो बाहेर नेला. सामाजिक कार्यकर्त्यांनी पुन्हा या मृतदेहावर अंत्यसंस्कार केले. मृतदेहाच्या या विटंबनेमुळे संताप व्यक्त करण्यात येत आहे.

मृतदेहाच्या या विटंबनेच्या घटनेनंतर महापौर बाबासाहेब वाकळे यांनी स्मशानभूमीत जाऊ न पाहणी केली. संतप्त झालेले महापौर वाकळे यांनी जबाबदार असलेल्या कर्मचाऱ्यावर कारवाई करण्याचे आदेश दिले. तसेच स्मशानभूमीच्या सोयीसुविधेसाठी चाळीस लाख रुपयांची कामे तातडीने सुरु करण्याचे आदेश दिले.

नालेगाव येथील अमरधाम स्मशानभूमीत काल रविवारी तेरा ते चौदा अंत्यविधी झाले होते. अंत्यविधीसाठी ओटय़ांची संख्या मोजकीच असल्याने काहींना ओटय़ाच्या खाली जमिनीवर मृतदेहावर अंत्यसंस्कार करण्यात आले होते. आज सकाळी दशक्रियाविधीच्या निमित्ताने लोक अमरधाम स्मशानभूमीत आले असता एक अर्धवट जळालेला मृतदेह मोकाट कु त्रे ओढून नेत असल्याचे नागरिकांनी पाहिले. त्यांनी नगरसेवक व महापालिकेच्या अधिकाऱ्यांना हा प्रकार कळविला. नागरिक मृतदेहाच्या विटंबनेने संतप्त झाले होते.

मोकाट कु त्र्यांनी स्मशानभूमीतून अर्धवट जळालेला मृतदेह बाहेर नेला होता. पण नवग्रह मित्रमंडळाचे अमोल बनकर व अन्य कार्यकर्त्यांनी हा मृतदेह पुन्हा चितेवर नेऊ न विधिवत त्याच्यावर अंत्यसंस्कार केले. हा प्रकार समजताच महापौर वाकळे यांनी स्मशानभूमीत जाऊ न पाहणी केली. दुपारी विद्युत विभाग, आरोग्य विभाग व उद्यान विभागाची बैठक घेतली. या बैठकीत स्मशानभूमीत सोयीसुविधा निर्माण करण्यासाठी तातडीने चाळीस लाखाची कामे करण्याचे आदेश दिले. तसेच बंद असलेली विद्युतदाहिनी सुरु करण्यास सांगितले. या विद्युतदाहिनीसाठी पूर्वी बाराशे रुपये शुल्क आकारले जात होते. ते आता नऊ शे रुपये करण्यात येईल. तसेच मुलतानचंद बोरा ट्रस्टच्यावतीने एक विद्युतदाहिनी बसविली जाणार असल्याचे त्यांनी सांगितले.

कारवाईची मागणी

स्मशानभूमीत पुन्हा मोकाट जनावरे व कु त्रे दिसल्यास कर्मचाऱ्यावर कारवाई करावी. जे कर्मचारी कामे करत नाहीत त्यांचे स्वेच्छानिवृत्त अर्ज मंजूर करावेत, असेही आदेश त्यांनी दिले. या बैठकीला उपमहापौर मालन ढोणे, उपायुक्त सुनील पवार, डॉ.प्रदीप पठारे, शशिकांत नजन, पी.एल.शेंडगे, अजय चितळे, संजय ढोणे आदि उपस्थित होते.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on December 3, 2019 4:25 am

Web Title: disgrace to dog dead body at nalgaon amardham cemetery zws 70
Next Stories
1 भाजप खासदाराचा दावा फडणवीस यांनी फेटाळला
2 सोलापुरात कांद्याची उसळी; १५ हजारांचा उच्चांकी दर
3 दोन चिमुकल्यांसह विवाहितेचा मृत्यू; खुनाचा गुन्हा
Just Now!
X