25 February 2021

News Flash

पंढरपूरच्या विठ्ठलाचे सशुल्क दर्शन वादाच्या भोवऱ्यात

बैठकीत राजकीय मंडळी आणि महाराज यांच्यात वाद झाला

पंढरपूरच्या श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिर समितीने ऑनलाइन दर्शनाला शुल्क आकारण्याचा निर्णय घेतला होता. मात्र याबाबत महाराज मंडळींशी चर्चा करून निर्णय घेतला जाईल असे सांगितले होते. या पार्श्वभूमीवर शनिवारी मंदिरात विविध महाराज मंडळी बैठकीला उपस्थित होते. या बैठकीला काही राजकीय पदाधिकारीही उपस्थित होते. यावेळी वारकरी पाईक संघटनेचे महाराज आणि राजकीय पदाधिकारी यांच्यात वाद झाला. मात्र या बैठकीत ७० टक्के महाराज मंडळीनी सशुल्क दर्शनाला पाठिंबा दिला असून लवकरच समितीच्या बैठकीत पुढील निर्णय घेऊ अशी माहिती मंदिर समितीचे सहअध्यक्ष ह.भ.प. गहिनीनाथ महाराज औसेकर यांनी दिली.

लाखो वैष्णव श्री विठ्ठलाचे दर्शनासाठी यात असतात. श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिर समितीने दर्शनासाठी ऑनलाईन दर्शन सेवा सुरु केली. कालांतराने मंदिर समितीने या दर्शनासाठी नाममात्र शुल्क आकारावे अशी चर्चा केली. याला काही महाराज मंडळीनी विरोध केला. त्यानंतर श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिर समितीच्या नुकत्याच झालेल्या बैठकीत ऑनलाईन दर्शनाला शुल्क आकारावे असा निर्णय घेतला. मात्र या बाबत विविध माह्राज मंडळी,वारकरी प्रतिनिधी यांच्याशी चर्चा करून निर्णय घेण्याचे ठरले. त्यानुसार शनिवारी श्री विठ्ठल मंदिरात विविध मठांचे मठाधिपती, महाराज मंडळी,वारकरी प्रतिनिधी याना बैठकीला निमंत्रित केले.

मंदिर समितीने आयोजित केलेल्या बैठकी सशुल्क दर्शनावरुन वाद झाला.

सुरवातील काही महाराज मंडळीनी आपले मत मांडले. मात्र त्यानंतर वादाला सुरवात झाली. उपस्थित राजकीय पदाधिकारी यांनी महाराज मंडळी भाविकांकडून देणगी,पैसे घेता आणि इथे का विरोध ? असे म्हणताच पाईक संघटनेचे ह.भ.प. वडगावकर,ह.भ.प. राणा महाराज वासकर, ह.भ.प वीर महारज आणि इतर महाराजांनी याला आक्षेप घेतला. महाराज मंडळींच्या बैठकीत हे का आले यावरून वादावादी झाली आणि या मंडळीनी बैठकीवर बहिष्कार टाकला. त्यानंतर पुढे बैठक झाली. या बैठकीत अनेकांनी सशुल्क दर्शनाला पाठिंबा दिला असून याबाबत मंदिर समितीच्या बैठकीत निर्णय घेतला जाईल अशी माहिती या बैठकीचे अध्यक्ष आणि समितीचे सहअध्यक्ष ह.भ.प. गहिनीनाथ महाराज औसेकर यांनी दिली. मुळात या बैठकीला महाराज मंडळी सोडून इतर मंडळीनी कोणी बोलावले आणि का बोलावले असा सवाल आता उपस्थित होत आहे.

मुख्यमंत्र्यांशी चर्चा करणार : ह.भ.प. वासकर महाराज
आज मंदिर समितीने ऑनलाइन दर्शनाला शुल्क आकारण्याच्या निर्णयासंदर्भात विचारविनिमय करण्यासाठी वारकरी संप्रदाय महाराज मंडळींना आमंत्रित केले होते, मात्र ऐनवेळी त्याठिकाणी राजकिय व सामाजिक संघटनांचे पदाधिकारी दाखल होऊन त्यांनी विषयावर चर्चा न करता वारकरी संप्रदायावर बेछूट आरोप सुरु केले सदर गोष्टीचा निषेध करत आम्ही सभात्याग केला. सशुल्क दर्शन कोणत्याही परिस्थितीत सुरू करण्यास आमचा आक्षेप असून आता थेट मुख्यमंत्र्यांशी भेट घेऊन चर्चा करणार असल्याचे ह.भ.प. राणा महाराज वासकर यांनी सांगितले.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on February 8, 2020 8:46 pm

Web Title: dispute between maharaj and political leaders on vitthal mandir online fee scj 81
Next Stories
1 महाराष्ट्रात भाजपाचं सरकार येत नाही तोपर्यंत ‘दिल्लीवारी’ नाही-फडणवीस
2 शिवसेना हिंदुत्वापासून दूर जाणार नाही-सुभाष देसाई
3 मोदी सरकारची महिलांबाबतची भूमिका दुटप्पी, मनसेचा आरोप
Just Now!
X