28 May 2020

News Flash

खासदार सुप्रिया सुळे यांच्या कार्यक्रमात राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांचा राडा

सुप्रिया सुळे यांना कार्यक्रम काही काळासाठी थांबवावा लागला

राष्ट्रवादीच्या खासदार सुप्रिया सुळे यांच्या कार्यक्रमात राडा झाला. दत्ता गोर्डे आणि संजय वाकचौरे या दोहोंच्या कार्यकर्त्यांमध्ये राडा झाला. औरंगाबादमधल्या पैठणमध्ये ही घटना घडली. यामुळे काही काळासाठी सुप्रिया सुळे यांना कार्यक्रम थांबवावा लागला. सुप्रिया सुळे या कार्यकर्त्यांना शांत राहण्याचं आवाहन करत होत्या. मात्र काही काळासाठी हा राडा झाला. त्यावेळी सुप्रिया सुळे यांनी दत्ता गोर्डे आणि संजय वाकचौरे यांच्या कार्यकर्त्यांना शांत राहण्याचं आवाहन केलं. मात्र काही काळासाठी हा राडा सुरुच होता.

खासदार सुप्रिया सुळे यांनी दोन्ही गटामधील कार्यकर्त्यांना शांत राहण्याचं आवाहन केलं. मात्र घोषणाबाजी थांबली नाही. तेव्हा सुप्रिया सुळे चांगल्याच चिडल्या. सुप्रिया सुळे चिडल्यावर कार्यकर्ते शांत झाले. हा वाद शांत झाला तेव्हा सुप्रिया सुळे यांनी गोर्डे आणि वाकचौरे या दोघांनाही कार्यक्रमाच्या ठिकाणाहून निघून जायला सांगितलं असं सूत्रांचं म्हणणं आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on February 21, 2020 2:37 pm

Web Title: dispute in ncp mp supriya sule program paithan scj 81
Next Stories
1 धक्कादायक! महाराष्ट्राच्या सुवर्णपदक विजेत्या बॉक्सरची आत्महत्या
2 सोलापुरात ST बसच्या धडकेत जीपचा चुराडा, पाच जणांचा मृत्यू
3 महाशिवरात्री विशेष: १०० किलो बेलपत्रांनी सजलं विठुमाऊलीचं मंदिर
Just Now!
X