जिल्ह्यात ४ लाख ५९ हजार ६८० लहानमोठय़ा पशुधनाची संख्या असून, त्यासाठी दरमहा ५८ हजार ३६९.६४ मे. टन चारा आवश्यक आहे. ३ लाख ८२ हजार ०.८१ मे. टन चारा उपलब्ध असून, आवश्यक लागणाऱ्या एकूण चाऱ्याची तूट ३१ लाख ८ हजार ३५४.६८ मे. टन इतकी आहे. ती भरून काढण्यासाठी जिल्हा प्रशासनाने कंबर कसली असून ही तूट भरून काढण्याचे आवाहन जिल्हाधिकारी तुकाराम कासार यांनी केले.
 जिल्हा परिषद शेष निधीतून १० लाख, जिल्हा वार्षिक योजनेतून २० लाख असे एकूण ३० लाख निधीमधून २९ लाख ठोंबे वाटप करण्याचे नियोजन करण्यात आले आहे. त्याकरिता सिंचन उपलब्ध असलेल्या ११६ हेक्टर क्षेत्रफळावर ठोंब्याची लागवड केली जाणार असून, लागवड झालेल्या दिनांकापासून ६० दिवसांनंतर चाऱ्याची पहिली कटिंग होऊन १ हजार ३० मे. टन उत्पादन अपेक्षित आहे. जून २०१५पर्यंत एकूण २ हजार ७८० मे. टन चारा उपलब्ध होणे अपेक्षित आहे. याचप्रमाणे वळूमाता प्रक्षेत्र िहगोली येथे दुष्काळ निवारणासाठी १०० मे. टन चारा अकोला येथील महाराष्ट्र पशुधन विकास मंडळ यांच्या परवानगीने उपलब्ध होण्याची शक्यता आहे. तसेच पोहरा (जि. अमरावती) यांच्याकडून ५० मे. टन वैरण उपलब्ध होण्याची अपेक्षा आहे.
जिल्ह्यामध्ये ज्या शेतकऱ्यांकडे सद्य:स्थितीत वैरण उत्पादनासाठी पाण्याची उपलब्धता आहे, अशा शेतकऱ्यांनी मंडळ गावनिहाय यादी कृषी विभागाकडून प्राप्त करून शेतकऱ्यांना पशुसंवर्धन विभागाच्या प्रस्तावित योजनेतून लाभ देण्यात येणार आहे. कामधेनू दत्तक ग्रामयोजना २०१३-१४ अंतर्गत जिल्ह्यातील २४ गावांमध्ये ३ लाख ८४ हजार ठोंबे वाटप केले. त्यापासून १ हजार ७५ मे.टन चारा उत्पादित होऊ शकतो. अशाप्रकारच्या नियोजनातून जून २०१५ पर्यंत ४००५ मे. टन चारा उत्पादित होणे अपेक्षित आहे.
जिल्ह्यात उपलब्ध होणारा चारा हा मार्च २०१५ पर्यंत पुरेल तसेच जून २०१५ पर्यंत १ लाख ८८ हजार १०३ मे. टन चाऱ्याची गरज भासणार आहे. ती गरज बाजारातून चारा खरेदी करून भागवावी लागणार आहे. एकूण उपलब्ध होणारा चारा ५ लाख ३० हजार ६७ मे. टन कृषी खात्याच्या अंदाजानुसार अपेक्षित आहे. प्रत्यक्षात उत्पादित झालेला अंदाजित चारा २ लाख ६५ हजार ३३ मे. टन, ऑक्टोबरअखेर शिल्लक चारा २ लाख ३७ हजार ३२६ मे. टन.
२०१४-१५ या वर्षांत जिल्हा वार्षिक योजनेत वैरण विकासासाठी १० लाखांची तरतूद आहे. त्यानुसार २२ हजार ३८४ किलो मका बियाणे वाटप करण्यात आले आहे. कामधेनू दत्तक ग्रामयोजनेतून ४ लाख ४ हजार रुपयांच्या निधीची मागणी करण्यात आली आहे. त्यातून ३ लाख ८४ हजार ठोंबे वाटप करण्याचे नियोजन आहे. जिल्हा परिषद शेष निधीतून १० लाखांची तरतूद प्रस्तावित आहे. त्यामधून ९ लाख ठोंबे वाटप करावयाचे असून त्यापासून १२ हजार ६७० मे. टन वैरण उपलब्ध होऊ शकते.
जिल्हा नियोजन समितीकडून अतिरिक्त २० लाखांची मागणी प्रस्तावित आहे. त्यामधून १८ लाख ठोंबे वाटप करावयाचे नियोजन आहे. नवीन चारा ऑक्टोबर महिन्यापासून वापरात येत असल्यामुळे उत्पादित चारा फेब्रुवारीपर्यंत पुरेल. खरीप, रब्बी, नसíगक स्रोत व पशुसंवर्धन विभागाच्या योजनांपासून उत्पादित होणारा चारा ५ तालुक्यांतील एकूण ४ लाख ३० हजार ४९८ क्षेत्रफळावर ३ लाख ३७ हजार २२७ मे. टन चारा उत्पादित होईल, यापकी प्रतिदिन लागणारा चारा १ हजार ९४६ मे. टन तर प्रतिमहिन्याला लागणारा चारा ५८ हजार ३७० मे. टन, जून २०१५ मध्ये लागणारा चारा ५ लाख २५ हजार ३३० मे. टन, तर जूनपर्यंत आवश्यक लागणारा चारा ५ लाख २५ हजार ३३ मे. टन आहे. हे नियोजन पाहता भासणारी चाऱ्याची तूट १ लाख ८८ हजार १०३ इतकी असेल, असे चाराटंचाईच्या नियोजनातून दिसून येते.