20 September 2020

News Flash

तोटय़ातील संस्थांचा वसुलीसाठी आटापिटा

जिल्हा सहकारी बँकेच्या निवडणुकीत तोटय़ातील सहकारी संस्थांना मतदानाचा हक्क मिळणार नसल्याने आता संस्थाचालकांनी वसुली सुरू केली आहे. संस्था नफ्यात आणून ठरावाचा लाभ पदरात पाडून घेण्यासाठी

| November 1, 2014 03:00 am

जिल्हा सहकारी बँकेच्या निवडणुकीत तोटय़ातील सहकारी संस्थांना मतदानाचा हक्क मिळणार नसल्याने आता संस्थाचालकांनी वसुली सुरू केली आहे. संस्था नफ्यात आणून ठरावाचा लाभ पदरात पाडून घेण्यासाठी त्यांचा आटापिटा आहे. श्रीरामपूर तालुक्यातील अनेक संस्था थकबाकीत असल्याने त्यांचा या निवडणुकीत ठराव होणार नाही. ही संधी मिळावी म्हणून प्रयत्न सुरू आहेत.
केंद्र सरकारने ९७व्या घटनादुरुस्ती अन्वये सहकार कायद्यात दुरुस्ती केली असून, बँकेच्या पोटनियमात झालेल्या बदलास विशेष सर्वसाधारण सभेस यापूर्वीच मंजुरी देण्यात आली आहे. अद्याप सुधारित पोटनियम मंजूर झाले नसले तरी लवकरच त्यास सहकार विभागाकडून मंजुरी मिळणार आहे.
सध्या मुदत संपलेल्या सेवा संस्थांच्या निवडणुका सुरू होणार असून राज्य सहकारी निवडणूक प्राधिकरणाने तयारी सुरू केली आहे. नव्या दुरुस्तीनुसार सभासदांनी घेतलेल्या कर्जाची परतफेड केली नाही व तो थकबाकीत गेला तर त्याला मतदानाचा हक्क मिळणार नाही. त्यामुळे अशा थकबाकीदारांना संस्थांनी नोटिसा पाठवून त्याचा भरणा जिल्हा बँकेत करण्यास सांगितले आहे. त्यानुसार संस्थांचे पदाधिकारी हे आपल्या मर्जीतील सभासदांचे खाते नवे जुने करावे म्हणून प्रयत्नशील होते. त्याची शुक्रवारी अखेरची मुदत होती. पण संस्थांनी उद्यादेखील (शनिवारी) वसुलीच्या रकमा स्वीकारण्याचा निर्णय घेतला आहे. दोन दिवस व्यवहार करून ते दि. ३० पूर्वी दाखविले जाणार आहे. त्यामुळे पदाधिका-यांची धावपळ सुरू आहे.
शेतकरी थकबाकीत गेल्याने यंदा सहकारी संस्थाही तोटय़ात जाणार आहे. बँकपातळीवर वसूल झाला नाहीतर जिल्हा सहकारी बँकेच्या आगामी निवडणुकीत त्या संस्थांच्या प्रतिनिधींना मतदान करता येणार नाही. जिल्हा बँकेकरिता सेवा संस्था मतदारसंघात मोजके मतदान असते. संस्थांच्या संचालकांचे मतदान प्रतिनिधी म्हणून गावोगाव ठराव होतात. निवडणुकीत मातब्बर नेते उभे राहतात त्यामुळे ठरावाच्या मतदानाला लाखो रुपये वाटले जाते. एका मताचा दर हा १० लाखांपर्यंतही जातो. तसेच अनेकांच्या मुलांना सहकारी संस्थामध्ये नोक-या मिळतात. त्यामुळे आपली संधी जाऊ नये म्हणून ठरावाच्या मतदानासाठी उत्सुक असलेल्या कार्यकर्त्यांनी बँकेच्या वसुलीसाठी प्रयत्न सुरू केले आहेत. तालुका पातळीवरील नेतेदेखील त्याकरिता मोर्चेबांधणीला लागले आहेत.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on November 1, 2014 3:00 am

Web Title: district co operative bank organisation started recovery
टॅग Shrirampur
Next Stories
1 पंकजांच्या मंत्रिपदाने बीडमध्ये आनंदोत्सव
2 नव्या मंत्रिमंडळात मराठवाडा ‘एकमेव’!
3 बीडला आठवडयात डेंग्यूचा तिसरा बळी!
Just Now!
X