02 March 2021

News Flash

करोनाचा प्रादुर्भाव वाढत असताना महाविद्यालये सुरू की बंद? शिक्षणमंत्री म्हणतात…

करोना बाधितांची सख्या पुन्हा वाढू लागलेली असताना महाविद्यालयांबाबत शिक्षणमंत्र्यांनी महत्त्वाची माहिती दिली आहे.

करोनाचे रुग्ण वाढताना दिसत आहेत. अशा स्थितीत महाविद्यालये सुरू ठेवण्याबाबत स्थानिक परिस्थिती पाहून जिल्हाधिकाऱ्यांनी निर्णय घेण्याच्या सूचना राज्य शासनाने दिल्या आहेत, अशी माहिती शिक्षण मंत्री उदय सामंत यांनी शनिवारी कोल्हापूर येथे पत्रकारांशी बोलताना दिली. राज्यात करोना रुग्ण वाढत चालले आहेत. याची जाणीव राज्य शासनाला झाली आहे. त्यासाठी शासनाने उपाययोजना सुरू केल्या आहेत. जिल्हा प्रशासनाला आवश्यक ती खबरदारी घेण्याच्या सूचना केल्या आहेत. करोनाच्या दुसऱ्याला दुसऱ्या लाटेला थोपवण्यासाठी राज्य सरकार तत्पर झाले आहे, असेही सामंत यांनी सांगितले.

चंद्रकांत पाटील यांच्यावर निशाणा

अधिवेशनाच्या तोंडावर महाराष्ट्रात करोनाचे रुग्ण वाढतात कसे? असा बोचरा सवाल भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी केला होता. यावर सामंत यांनी ‘महाराष्ट्रातच नव्हे तर गुजरात, मध्यप्रदेश या राज्यात देखील करोनाचे रुग्ण वाढत आहेत. याचा अर्थ त्या राज्यातही अधिवेशन असल्यामुळे असे रुग्ण वाढत आहेत का? असा प्रतिसवाल त्यांनी उपस्थित केला.

गेल्या काही दिवसांमध्य राज्यात करोनाचे रुग्ण वाढू लागलेल आहेत. या पार्श्वभूमीवर राज्यात शाळा आणि महाविद्यालये सुरू ठेवावीत का? ठेवली तर ती किती क्षमतेने सुरू ठेवावीत? किंवा ती बंद करावीत का? यासंदर्भात स्थानिक जिल्हाधिकाऱ्यांनी परिस्थितीचा आढावा घेऊन निर्णय घ्यावा, असे निर्देश प्रशासनाकडून देण्यात आले आहेत.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on February 20, 2021 7:58 pm

Web Title: district collectors will decide about collages in corona says uday samant pmw 88
Next Stories
1 पूजा चव्हाण आत्महत्येच्या प्रश्नावर संजय राऊत म्हणाले…
2 राज ठाकरेंच्या अयोध्या दौऱ्याबद्दल संजय राऊत म्हणाले…
3 मुंबई-पुणे महापालिका निवडणूक शिवसेना-राष्ट्रवादी एकत्र लढणार? संजय राऊत यांचे महत्त्वाचे विधान
Just Now!
X