News Flash

शिक्षक बँकेच्या शतकोत्तरी सभेत पोलिसांनी  दंडुका उगारला!

 गेल्या काही दिवसांपासून सुरू असलेल्या भ्रष्टाचाराच्या आरोपांमुळे प्राथमिक शिक्षकांतील वातावरण चांगलेच तापले होते.

 

राज्य कार्यक्षेत्राचा विषय विरोधामुळे तहकूब

नगर : जिल्हा प्राथमिक शिक्षक बँकेची सभा ‘ऑफलाइन’ असो की, ‘ऑनलाईन’ गोंधळाची परंपरा कायम राहिली. आज, रविवारी झालेल्या १०१ व्या वार्षिक ‘ऑनलाइन‘ सभेतही फूट पडलेले सत्ताधारी संचालक व विरोधक आरोप-प्रत्यारोप करीत एकमेकांवर धावले. अखेर पोलिसांना हस्तक्षेप करीत हा गोंधळ थांबवावा लागला. एका प्रसंगात तर पोलिसांना दंडुका उगारावा लागला.

प्रचंड विरोधामुळे प्राथमिक शिक्षक बँकेचे कार्यक्षेत्र राज्यभर करण्याचा प्रस्ताव अखेर तहकूब ठेवावा लागला. मात्र सभेपुढील इतर सर्व विषय आवाजी स्वरूपात मंजूर करण्यात आले. बँकेचे अध्यक्ष राजू राहणे यांच्या अध्यक्षतेखाली वार्षिक सभा ऑनलाईन पद्धतीने आयोजित करण्यात आली होती.  ३८०० शिक्षक सभासद सभेत  ऑनलाईन सहभागी झाले होते.

गेल्या काही दिवसांपासून सुरू असलेल्या भ्रष्टाचाराच्या आरोपांमुळे प्राथमिक शिक्षकांतील वातावरण चांगलेच तापले होते. त्या तुलनेत सभा काहीशी शांततेत झाली. मात्र  तब्बल ५ तास चालली. बँकेच्या शताब्दीनिमित्त जमा केलेली वर्गणी, त्याचा खर्च, सभासदांना घड्याळ म्हणून दिलेली भेट, विकास मंडळाच्या इमारतीसाठी वर्ग केलेल्या बँकेच्या ठेवी, संचालकांच्या बैठकांचा भत्ता, शाखांची फर्निचर खरेदी, असे विषय वादग्रस्त ठरले.  बँकेतील सत्ताधारी संचालक मंडळात काही दिवसांपूर्वी फूट पडली आहे. रोहोकले गटाच्या सात संचालकांनी चौकशीची मागणी केली आहे. त्याचेही पडसाद सभेत उमटले.

सर्व विषय  आवाजात संमत करण्याचा संचालक मंडळाचा प्रयत्न हाणून पाडण्यासाठी विरोधी मंडळाचे नेते डॉ. संजय कळमकर, राजेंद्र निमसे, विकास डावखर, प्रवीण ठुबे, राजेंद्र शिंदे, राजकुमार साळवे, एकनाथ व्यवहारे, बाळासाहेब सरोदे, आदी  सभागृहात शिरले. सत्ताधारी गटाच्या विद्युल्लता आढाव, बापूसाहेब तांबे, सलीमखान पठाण, शरद सुद्रिक आदींनी त्यांना थोपवण्याचा प्रयत्न केला.  त्यामुळे पोलिसांना दंडुका दाखवावा लागला.  विकास डावखर यांचे भाषण ऑनलाइन पद्धतीने बंद करण्यात आल्याने ते संतप्त झाले होते.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on March 29, 2021 12:44 am

Web Title: district primary teachers bank meetings can be offline online akp 94
Next Stories
1 Coronavirus – राज्यात दिवसभरात ४० हजार ४१४ करोनाबाधित वाढले, १०८ मृत्यू
2 पालघरमध्ये जमाबंदीची पहिली धडक कारवाई
3 Coronavirus – “… त्याशिवाय करोनावर नियंत्रण शक्य नाही”
Just Now!
X