News Flash

Diwali 2018: धनत्रयोदशी, यमदीपदान- म्हणून कणकेचा दिवा दक्षिणेस ज्योत करून ठेवावा

आश्विन कृष्ण त्रयोदशी म्हणजेच धनत्रयोदशी, यमराजाला प्रसन्न करण्याकरिता या दिवशी यमदीपदान केले जाते.

आश्विन कृष्ण त्रयोदशी म्हणजेच धनत्रयोदशी, यमराजाला प्रसन्न करण्याकरिता या दिवशी यमदीपदान केले जाते

धनत्रयोदशी, यमदीपदान (५ नोवेंबर २०१८, सोमवार)

आश्विन कृष्ण त्रयोदशी म्हणजेच धनत्रयोदशी, यमराजाला प्रसन्न करण्याकरिता या दिवशी यमदीपदान केले जाते. घरातील अलंकार, सोने – नाणे स्वच्छ केले जाते. विष्णू, लक्ष्मी, कुबेर, योगिनी, गणेश, नाग, द्रव्यनिधी यांची पूजा केली जाते. अपमृत्यु म्हणजेच अकाळी, अपघाताने मृत्यु येऊ नये याकरिता सायंकाळी कणकेचा दिवा दक्षिणेस ज्योत करून ठेवावा व खालील श्लोक म्हणून दिव्यास नमस्कार करावा, असे आवाहन दाते पंचागकर्ते यांनी केले आहे.

मृत्यूना पाशदंडाभ्यां कालेन श्यामयासह ।
त्रयोदश्यां दीपदानात् सूर्यजः प्रीयतां मम ।।

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on November 5, 2018 8:40 am

Web Title: diwali 2018 dhanteras yam dip dan pooja
टॅग : Diwali 2018
Next Stories
1 पावसाची शक्यता कायम
2 राष्ट्रवादीची पुणे, औरंगाबाद मतदारसंघांची मागणी
3 ‘जलयुक्त’ कोटय़वधी खर्चूनही ‘गाळात’च!
Just Now!
X