News Flash

‘भावा-बहिणीची साथ आयुष्यभर अतूट राहू दे’, धनंजय मुंडेंनी दिल्या भाऊबीजेच्या शुभेच्छा

"जिव्हाळ्याचे नाते दर दिवसागणिक उजळत राहू दे...

(संग्रहित छायाचित्र)

विधानसभा निवडणुकीत परळी विधानसभा मतदारसंघातून भाजपाच्या नेत्या व बहीण पंकजा मुंडेंचा दणदणीत पराभव करुन जिंकून आलेले राष्ट्रवादीचे नवनिर्वाचित आमदार धनंजय मुंडे यांनी भाऊबीजेनिमित्त शुभेच्छा दिल्या आहेत.

“जिव्हाळ्याचे नाते दर दिवसागणिक उजळत राहू दे…भावा-बहिणीची साथ आयुष्यभर अतूट राहू दे… महाराष्ट्रातील माझ्या सर्व भगिनींना भाऊबीजेच्या हार्दिक शुभेच्छा!” असं ट्विट करत मुंडेंनी भाऊबीजेनिमित्त शुभेच्छा दिल्यात.

यापूर्वी काल(दि.२८) धनंजय मुंडे यांनी सुप्रिया सुळे यांच्यासोबतचा फोटोही ट्विटरद्वारे शेअर केला. सुप्रिया सुळेंच्या फोटोसोबत ट्विट करताना मुंडेंनी “मानलेलं जरी असलं…तरी रक्ताच्या नात्याहून कमी नसतं…बहिण भावाचे नातं असंच अनमोल असतं! उद्या भाऊबीज व आजच गोविंदबागेत सुप्रियाताई सुळे यांनी शुभेच्छा देऊन आशीर्वाद दिला. भाऊबीजेच्या आधीच मला आशीर्वादरुपी भाऊबीज मिळाली त्याचा आनंद शब्दात व्यक्त करणं सुद्धा कठीण आहे. ” असं म्हटलं होतं.

दरम्यान, परळी विधानसभा मतदारसंघात धनंजय मुंडे आणि पंकजा मुंडे या भावा-बहिणींची लढत झाली. यात मुंडे यांनी बाजी मारताना तब्बल 30 हजारांहून अधिक मताधिक्य घेत भाजपाच्या पंकजा मुंडे यांचा दणदणीत पराभव केला.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on October 29, 2019 10:00 am

Web Title: diwali bhai dooj bhau beej 2019 wishes from ncp dhananjay munde sas 89
Next Stories
1 आदित्य ठाकरेंसाठी युवासेना म्हणतेय ‘माझा आमदार, माझा मुख्यमंत्री’
2 ‘आमच्या येथे डिपॉझिट जप्त करून मिळेल’; पुण्यात नाही तर बारामतीत पाट्या
3 “सरकार स्थापनेसाठी आम्हाला पर्याय निवडण्यास भाग पाडू नका”
Just Now!
X