03 December 2020

News Flash

औरंगाबाद : दिवाळी बोनस न दिल्यामुळे मालकाचे पाडले दात

दिवाळीमध्ये मालकाकडून स्वखुशीने कामगारांना बोनस दिला जातो

दिवाळी सणानिमित्त कामगारांना बोनस देण्याची प्रथा आहे. मालकाकडून स्वखुशीने कामगारांना बोनस दिला जातो. मात्र, दिवाळीचा बोनस दिला नाही म्हणून औरंगाबादमधील एका कामगाराने मालकाला बेदम मारहाण करत दात पाडल्याची घटना समोर आली आहे. शुक्रवारी रात्री चिकलठाणा एमआयडीसी भागात ही घटना घडली आहे. याप्रकरणी पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

दिवाळीचा बोनस नंतर देतो असे म्हणणार्‍या भिमा चंद्रदेव जोशी (वय ५०, रा.उत्तरानगरी, ब्रिजवाडी) या लेबर कॉन्ट्रक्टरला मजूराने शिवीगाळ करून बदडले. ही घटना २६ ऑक्टोबर रोजी सायंकाळी साडेपाच वाजेच्या सुमारास चिकलठाणा एमआयडीसी परिसरातील उत्तरानगरी येथे घडली. बाळू पठारे (रा.गांधीनगर, ब्रिजवाडी) असे लेबर कॉन्ट्रक्टरला मारहाण करणार्‍या मजूराचे नाव आहे.

आरोपी बाळू पठारे याने मालक भीमा जोशी यांना बोनसची मागणी केली, पण जोशी यांनी आता पैसे नाहीत. नंतर बोनस देतो, असे सांगितले. त्यावर बाळूला राग अनावर झाला व त्याने जोशी यांना मारहाण करण्यास सुरूवात केली. बाळूनं जोशी यांच्या तोंडावर ठोसा लगावला, यामध्ये जोशींचे दात पडले. याप्रकरणी एमआयडीसी सिडको पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास जमादार शेख अफसर करीत आहेत.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on October 28, 2019 12:28 pm

Web Title: diwali bonus fight worker and boss nck 90
Next Stories
1 मराठवाडय़ातील चार जिल्हे ‘काँग्रेसमुक्त’!
2 तिसरा विजय साधलेले पाच आमदार अन् हुकलेले तिघे
3 औरंगाबाद ग्रामीणच्या सहाही मतदारसंघात महायुती
Just Now!
X