10 August 2020

News Flash

दिवाळी फराळ सुगरण स्पध्रेत बीना शहा

अलिबाग नगर परिषदेतर्फे दिवाळी महोत्सवानिमित्त आयोजित करण्यात आलेल्या ‘दिवाळी फराळ सुगरण पाककला’ स्पध्रेत बीना शहा

| November 3, 2013 04:36 am

अलिबाग नगर परिषदेतर्फे दिवाळी महोत्सवानिमित्त आयोजित करण्यात आलेल्या ‘दिवाळी फराळ सुगरण पाककला’ स्पध्रेत बीना शहा यांनी प्रथम क्रमांक मिळविला. कांचन आसावा यांनी द्वितीय, तर सरिता गायकवाड यांनी तृतीय क्रमांक मिळवला. सोष्टे यांना उत्तेजनार्थ पारितोषिक देण्यात आले. बीना शहा यांचा शाही तुकडय़ाला सार्वाधिक गुण मिळाले. कांचन आसावा यांनी मॅजिक पोटला केला होता. सरिता गायकवाड यांनी काजू कतली बनविली होती. पारितोषिक विजेत्या स्पर्धकांना महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाचे जनसंपर्क अधिकारी संजय भुस्कुटे यांच्या हस्ते परितोषिक वितरण करण्यात आले. अलिबागच्या नगराध्यक्षा अ‍ॅड. नमिता नाईक, उपनगाराघ्यक्षा सुरक्षा शाह, नगर परिषदेच्या मुख्याधिकारी कल्पिता अ‍ॅड. राजेंद्र जैन, नगरपालिकेचे पाणीपुरवठा सभापती महेश िशदे, अ‍ॅड. विलास नाईक, नगरसेविका सुषमा पाटील, राकेश जगताप व राकेश चौलकर तसेच इतर मान्यवर उपस्थित होते. अलिबागच्या नगराध्यक्षा अ‍ॅड. नमिता नाईक यांनी राजकारणाबरोबरच समाजकारण करून अलिबागचा चेहरामोहरा बदलून महाराष्ट्रामध्ये आपल्या कामाचा वेगळा ठसा उमटवला आहे. महिला बचत गटाला उद्योगाची जोड देऊन त्यांनी स्तुत्य उपक्रम राबवला आहे, असे संजय भुस्कुटे म्हणाले. महिलांना उद्योग करण्याची प्रेरणा मिळावी म्हणून या अलिबाग दिवाळी महोत्सवाचे आयोजन करण्यात येते. या उपक्रमामुळे महिलांना उद्योगाची आवड निर्माण झाली. काहींनी आपले स्वत:चे व्यवसाय स्थापन केले आहेत, असे नगराध्यक्षा अ‍ॅड. नमिता नाईक म्हणाल्या.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on November 3, 2013 4:36 am

Web Title: diwali food cock compatition
टॅग Diwali
Next Stories
1 केळकर समितीची ‘अनुशेष’ वादाला बगल!
2 गोड म्हणून ऊस मुळासकट खाणे गैरच : छगन भुजबळ
3 निळवंडेतून जायकवाडीसाठी विसर्ग चालूच राहणार
Just Now!
X