13 August 2020

News Flash

करोनाच्या पार्श्वभूमीवर अंधश्रद्धेला बळी पडू नये

अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे आवाहन

संग्रहित छायाचित्र

करोनाचा प्रादुर्भाव दिवसेंदिवस वाढत असताना यावर दैवी उपचार सांगणाऱ्यांचेही संख्या वाढत चालली आहे. अशा भोंदूबाबांपासून लोकांनी सावधान राहावे. या भोंदूच्या अंधश्रद्धेला बळी पडू नये, असे आवाहन महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीने केले आहे.

करोनाबाबत समाजमनात एक अदृश्य, अनामिक भीती निर्माण होणे साहजिक आहे. या भीतीचा स्वार्थासाठी उपयोग करून घेणारीही काही मंडळी आहेत. देव-धर्म, अध्यात्म यांच्या नावाखाली करोनासारख्या जीवघेण्या विषाणूपासून सुटका करून घेण्यासाठी तंत्र-मंत्र, जपजाप्य, धार्मिक प्रार्थना, पूजापाठ, होम-हवन, पठण अशा विविध अवैज्ञानिक, दैवी उपायांचे खात्रीशीर दावे, छातीठोकपणे करून लोकांच्या गळी उतवण्यात, ही ढोंगी मंडळी यशस्वी होताना दिसतात. त्यासाठी सोशल मीडियाचा मोठय़ा प्रमाणात वापर त्यांच्याकडून केला जात आहे. करोनाच्या पार्श्वभूमीवर समाज या अंधश्रद्धांना बळी पडण्याची शक्यता निर्माण झाली आहे. जोपर्यंत करोनावर खात्रीशीर वैद्यकीय उपाय, उपचार उपलब्ध होत नाही तोपर्यंत करोनाबाबतची भीती लोकांच्या मनात कमी, अधिक राहण्याची शक्यता आहे. अशा परिस्थितीत नागरिकांनी भोंदूबाबांपासून सजग राहावे. एक विवेकी कार्यकर्ता म्हणून अशा ढोंगी बाबांच्या हालचालींवर लक्ष ठेवून असायला हवे. शोषणाचे असे प्रकार लक्षात येताच प्रशासनाला याची माहिती द्यावी.

दैवी उपचार सांगणाऱ्या व अफवा पसरवणाऱ्या भोंदूगिरीविरोधात प्रबोधन करणे आवश्यक आहे. भोंदूबाबांच्या मागे लागू नये. प्रशासनाच्या आदेशाचे काटेकोरपणे पालन करावे, असे आवाहन अंनिसचे प्रशांत पोतदार यांनी केले आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on March 26, 2020 12:58 am

Web Title: do not fall prey to superstition in the background of corona abn 97
Next Stories
1 साताऱ्यात आणखी ८ जणांचे नमुने तपासणीसाठी
2 शेतमालाच्या लिलावात पुरवठय़ातील अडचणींचा अडसर
3 करोना तपासणीचा अवघड प्रवास
Just Now!
X