“अनेक वर्षे शिवसेनेसोबत आणि मुख्यमंत्र्यांसोबत काम केलं आहे. त्यामुळे त्यांना नको असला तरी फुकटचा सल्ला देतो की शेवटी सत्ता येते आणि जाते, पण जन्मभर इतिहास हे लिहून ठेवतो की सत्तेत कोणी किती लाचारी स्वीकारली. त्यामुळे कृपया काँग्रेसच्या नादी लागून स्वातंत्र्यवीर सावरकरांना अशाप्रकारे अपमानित करू नका आणि त्याकरिता लाचारी स्वीकारू नका.” असं म्हणत विधानसभा विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी पत्रकारपरिषदेत बोलताना मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यावर निशाणा साधला.

या पत्रकारपरिषदेत भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील,विधानपरिषद विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर,  माजी अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार यांची देखील उपस्थिती होती.

… म्हणून राज्य सरकार अधिवेशनापासून पळ काढत आहे – फडणवीस

यावेळी बोलताना फडणवीस म्हणाले, “आताची परिस्थिती अशी आहे की सरकार लाचार आहे, लाचारी किती आहे बघा ज्या स्वातंत्र्यवीर सावरकारांसाठी कुठलंही बलिदान देण्याची तयारी हिंदुहृदयसम्राट शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांची होती. आज त्यांचे सुपुत्र मुख्यमंत्री झाल्यानंतर स्वातंत्र्यवीर सावरकरांच्या जयंतीला अभिवादन देखील करत नाहीत. एक ट्विट नाही, अभिवादनपर एक वाक्य नाही, ही केवढी लाचारी आहे. मला असं वाटतं की, काँग्रेसने तर जन्मभर स्वातंत्र्यवीर सावरकरांवर अन्याय केलाच, पण त्याही पेक्षा सत्तेच्या लाचारीमध्ये जो अन्याय मुख्यमंत्र्यांच्या माध्यमातून होतो आहे, मला खरोखर याचं आश्चर्य वाटतं.”

संजय राठोड यांना त्यांच्या वरिष्ठांचा पूर्ण आशीर्वाद – फडणवीस

या अगोदर भाजपा खासदार नारायण राणे यांनी काल(शनिवार) मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंवर या मुद्यावरून जोरदार टीका केली होती. स्वातंत्र्यवीर सावरकरांच्या पुण्यतिथीनिमित्त मुख्यमंत्र्यांच्या ट्विटर हॅण्डलरवरून सावरकरांना अभिवादन करण्यात न आल्याने राणेंनी निशाणा साधला होता. “स्वातंत्र्यवीर सावरकरांचा विसर कशासाठी? सत्तेसाठी आणि पदासाठी ही लाचारी” असं ते मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंना उद्देशून म्हणाले होते.

“स्वातंत्र्यवीर सावरकरांचा विसर कशासाठी? सत्तेसाठी आणि पदासाठी ही लाचारी”

“काल स्वातंत्र्यवीर सावरकरांच्या पुण्यतिथीनिमित्त सीएमओ महाराष्ट्र आणि मुख्यमंत्र्यांच्या वैयक्तिक सोशल मीडियावरुन अभिवादन व्यक्त करण्यात आले नाही. स्वातंत्र्यवीर सावरकरांचा विसर म्हणजे हिंदुत्वाचा विसर. स्वातंत्र्यवीर सावरकरांचा विसर कशासाठी? सत्तेसाठी आणि पदासाठी ही लाचारी.” अशा शब्दांमध्ये ट्विट करून नारायण राणेंनी टीका केली होती.