News Flash

वर्षभर काय करायचे ते करून घ्या, त्यानंतर ‘चुन-चुनके….’; धनंजय मुंडेंचा भाजपाला इशारा

मुंडे म्हणाले, आघाडी सरकारने महागाई केली असे सांगत लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीपूर्वी जनतेची दिशाभूल करून भाजपा सत्तेवर आले.

राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आणि विधान परिषदेतील विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे.

केंद्रात, राज्यात भाजपाची सत्ता येऊन चार वर्ष झाले. या काळात सरकारकडून विकासाच्या नावाखाली भ्रष्टाचाराला खतपाणी घातले गेले. या सताधाऱ्यांनी आता जे काही करायचे आहे, ते वर्षभर करा त्यानंतर हे खपवून घेतलं जाणार नाही, अशा शब्दांत विधानपरिषदेचे विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे यांनी भाजपवर निशाणा साधला. यासाठी ‘चुन चुनके…’ आणि ‘चुकीला माफी नाही’ अशी इशारावजा फिल्मी डायलॉगबाजीही केली.

पुणे महानगरपालिकेतील विरोधी पक्षनेते चेतन तुपे यांची पुणे शहर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या अध्यक्षपदी निवड झाल्याबद्दल हडपसर ग्रामस्थ सत्कार समितीच्यावतीने विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे यांच्या हस्ते स्मृतीचिन्ह, फुले पगडी देऊन गौरवण्यात आले. यावेळी धनंजय मुंडे बोलत होते.

मुंडे म्हणाले, आघाडी सरकारने महागाई केली असे सांगत लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीपूर्वी जनतेची दिशाभूल करून भाजपा सत्तेवर आले. मात्र, त्यांनी ५० रुपये पेट्रोल ८० वर नेलं आणि ४०० रुपयांचा गॅस ८०० वर नेला. यामुळे सर्व सामान्य नागरिक त्रस्त झाला असून पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या लाटेत खासदार, आमदार आणि नगरसेवक निवडून आले. मात्र, लाट कधी कायम राहत नाही, हा देशाचा इतिहास असल्याचे सांगत पुढील निवडणुकीत भाजपाचा पराभव होईल असे सूचकपणे सांगितले.

यावेळी भाजपाच्या कारभारावर त्यांनी सडकून टीका करीत ज्या नागरिकांनी मतदानाच्या माध्यमातून भाजपाला सत्तेमध्ये बसविले तेच यांना आता खाली खेचतील, असेही मुंडे यावेळी म्हणाले. यावेळी राज्याचे मंत्री, केंद्रीय मंत्री पुण्याचे आहेत. मात्र, पुणे शहराचा विकास कुठं गेला अशा शब्दांत मुंडे यांनी गिरीश बापट, दिलीप कांबळे, प्रकाश जावडेकर यांचा खरपूस समाचार देखील घेतला.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on August 25, 2018 10:55 pm

Web Title: do what you want to do all year long then chun chunke dhananjay mundanes warning to bjp
Next Stories
1 पिंपरीत स्वाइन फ्लूमुळे ११ दिवसांत पाच जणांचा मृत्यू
2 गणेशोत्सवाचे जनक भाऊसाहेब रंगारी नव्हे, पुणे महापालिकेने हटवला उल्लेख
3 रामदेवराव यादवकालीन ७०५ वर्षांपूर्वीचा शिलालेख सापडला
Just Now!
X