05 August 2020

News Flash

विनयभंगाचा गुन्हा दाखल झाल्यानंतर डॉक्टरची आत्महत्या

इमारतीच्या गच्चीवरुन उडी मारुन आत्महत्या

गोविंद गोरे

विनयभंगाचा गुन्हा दाखल झाल्याने डॉक्टरने आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना नाशिकमध्ये घडली आहे. नाशिकमधील सिन्नर येथील एका महिलेने डॉक्टरविरोधात तक्रार दाखल केली. त्यामुळे तणावत असलेल्या डॉक्टरने इमारतीच्या गच्चीवरुन उडी मारुन आत्महत्या केली.

मिळालेल्या माहितीनुसार, आत्महत्या केलेल्या डॉक्टरचे नाव गोविंद गोरे असे आहे. ते सिन्नरमध्ये स्नेहल रुग्णालय चालवायचे. एक महिला रुग्ण त्यांच्याकडे पित्तावर उपचार घेण्यासाठी आली होती. मागील बऱ्याच काळापासून या महिलेवर उपचार सुरु होते. एकदा चेकअपदरम्यान गोरे यांनी या महिला रुग्णाला ‘तू मला खूप आवडते,’ असं सांगितलं.

या प्रकारामुळे संतापलेल्या महिलेने थेट सिन्नर पोलिसांकडे तक्रार दाखल केली. महिलेच्या तक्रारीनंतर पोलिसांनी डॉक्टर गोरेंविरोधात विनयभंगाचा गुन्हा दाखल केला. आपल्याविरोधात गुन्हा दाखल झाल्याचे समजल्यानंतर डॉक्टर गोरे प्रचंड तणाव आला. यामधूनच त्यांनी आत्महत्येचा निर्णय घेतला.

गुन्हा दाखल झाल्यानंतर अवघ्या चार ते पाच तासांमध्ये त्यांनी इमारतीच्या गच्चीवरुन उडी मारुन आत्महत्या केली. गोरे यांच्या आत्महत्येची माहिती मिळताच पोलीस घटनास्थळी दाखळ झाले. त्यांनी या प्रकरणाची सखोल चौकशी सुरु केली आहे. गोरे यांनी अशाप्रकारे अगदी टोकाचा निर्णय घेतल्याने त्यांच्या नातेवाईकांना मानसिक धक्का बसला आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on January 15, 2020 9:16 am

Web Title: doctor committees suicide in nashik scsg 91
Next Stories
1 मुनगंटीवार यांना पडलेल्या बाळबोध प्रश्नाचे उत्तर मोदीच देतील -शिवसेना
2 “येत कसा नाही आलाच पाहिजे”, नवरा अमेरिकेतून परत येत नसल्याने बायकोचं आंदोलन
3 “फुटकळ लेखकाला भाजपातून हाकलून का दिले नाही?”
Just Now!
X