News Flash

सांगलीत डॉक्टर दाम्पत्याची हत्या

डॉ प्रकाश कुलकर्णी आणि अरुणा कुलकर्णी यांची चाकूने भोसकून हत्या करण्यात आली आहे.

सांगली जिल्ह्यातील इस्लामपुरात डॉक्टर दाम्पत्याच्या निघृण हत्या केल्याची खळबळजनक घटना घडली आहे. डॉ प्रकाश कुलकर्णी आणि अरुणा कुलकर्णी यांची चाकूने भोसकून हत्या करण्यात आली आहे.
कुलकर्णी यांच्या घरी आज सकाळी मोलकरीण काम करण्यास गेली होती. त्यावेळी कोणीच दरवाजा उघडत नसल्याने त्यांना फोनही केले. मात्र, समोरून कोणताच प्रतिसाद न मिळाल्याने मोलकरणीने शेजा-यांची मदत घेतली. त्यावेळी प्प्रकाश कुलकर्णी यांचा मृतदेह बेडरुमध्ये तर पत्नी अरुणा कुलकर्णी यांचा मृतदेह किचनमध्ये आढळून आला. दरम्यान, पोलीस घटनास्थळी दाखल झाले असून या हत्येबाबतचा तपास सुरु करण्यात आलाय. हत्येच्या घटनेनंतर संपूर्ण शहरात नाकाबंदी करण्यात आलीय.
कुलकर्णी दाम्पत्याला एक मुलगा आणि मुलगी असून, मुलगा बेळगावात तर मुलगी मुंबईत राहत असल्याचे कळते.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on December 20, 2015 1:22 pm

Web Title: doctor couple found dead in home at sangali
Next Stories
1 नाशिक जिल्ह्यत अपघातात पाच युवक ठार
2 आठ वर्षांच्या मुलाचा साधूकडून खून
3 मिरजमध्ये ७३ जणांना वास्तुशांतीच्या जेवणातून विषबाधा
Just Now!
X