15 January 2021

News Flash

२६/११ च्या हल्ल्यातून वाचलेल्या डॉक्टरचा अपघाती मृत्यू

बुधवारी संध्याकाळी हा अपघात झाला

मुंबईवर झालेल्या २६/११ च्या दहशतवादी हल्ल्यातून वाचलेले डॉ. थॉमस उलेदार यांचा अपघाती मृत्यू झाला आहे. मुंबई अहमदाबाद मार्गावर हा अपघात झाला. डॉ. थॉमस उलेदार आणि त्यांच्या दोन मुलांचा या अपघातात मृत्यू झाला. भरधाव वेगाने जाणाऱ्या टेम्पेने नॅनो कारला उडवलं ज्यामुळे ही दुर्घटना घडली आहे. डॉ. थॉमस उलेदार हे त्यांची पत्नी मेरी, १० वर्षांचा मुलगा बेनी आणि ५ वर्षांचा दुसरा मुलगा इझायल यांच्यासोबत नॅनो कारने प्रवास करत होते त्याचवेळी हा अपघात झाला.

थॉमस आणि कुटंबीय एका कार्यक्रमासाटी विरारला जात होते. गुजरात लेनवर जाताना पाठीमागून येणाऱ्या भरधाव टेम्पोने थॉमस यांच्या कारला उडवलं आणि तो फरार झाला. या अपघातात डॉ. थॉमस आणि त्यांच्या दोन मुलांचा जागीच मृत्यू झाला तर त्यांच्या पत्नी जखमी झाल्या. मेरी यांच्यावर वसईतील प्लॅटिनम रूग्णालायता उपचार सुरू आहेत. थॉमस यांच्या कारला देण्यात आलेली धडक इतकी भीषण होती की कार मुंबई लेनवर येऊन पडली ज्या ठिकाणी आणखी एका टेम्पोने या कारला धडक दिली. बुधवारी संध्याकाळी साडेसहाच्या सुमारास हा अपघात झाला आहे.

मुंबईवर जेव्हा २६/११ चा दहशतवादी हल्ला झाला होता तेव्हा कसाब आणि अबू इस्माइल या दोन दहशतवाद्यांनी कामा रूग्णालयात गोळीबार केला होता. या गोळीबारातून डॉक्टर थॉमस वाचले होते. डॉ. थॉमस त्यांच्या बहिणीच्या डिलिव्हरीसाठी गेले असतानाच हा दहशतवादी हल्ला झाला होता. त्यावेळी डॉक्टर थॉमस त्यांचे भावजी आणि एका मित्राला कसाबने बंधक बनवलं होतं. मात्र त्या घटनेतून थॉमस यांचा जीव वाचला. मात्र बुधवारी झालेल्या अपघातात त्यांचा मृत्यू झाला.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on July 4, 2019 2:50 pm

Web Title: doctor thomas uledar who survived from 2611 attack dies in road accident scj 81
Next Stories
1 खड्ड्यांमुळे नितेश राणेंचा ‘स्वाभिमान’ दुखावला, उप अभियंत्यावर चिखलफेक
2 पंढरीची सायकलवारी: १५ वर्षाच्या मुलीने एका दिवसात केला २५० किमीचा प्रवास
3 आषाढी यात्रेसाठी विठुरायाच्या २४ तास दर्शनाला सुरुवात
Just Now!
X