टाळेबंदीच्या काळात स्थानिक पातळीवर वैद्यकीय सुविधा देण्याचा उपक्रम महापालिकेने हाती घेतला असून डॉक्टर आपल्या दारी या उपक्रमाअंतर्गत बुधवारी सांगलीत महिलांची आरोग्य तपासणी करण्यात आली.

महापालिकेने मिरज, सांगली आणि कूपवाड शहरात विविध १२ ठिकाणी तापाचे दवाखाने सुरू केले आहेत. तसेच ए. बी. पाटील चॅरिटेबल ट्रस्ट कडून दोन फिरते तापाचे दवाखाने सुरू केले

आहेत. आज या फिरत्या दवाखान्याच्या टीमकडून सुंदरनगरमधील महिलांची वैद्यकीय तपासणी करण्यात आली. या तपासणीमध्ये येथील १५० महिलांची संपूर्ण आरोग्य तपासणी करण्यात आली असून यामध्ये ताप, सर्दी, खोकला, धाप, श्वसनाचे आजार आणि धाप लागणे आदी लक्षणाबाबत तपासणी केली.

महापालिकेच्या महिला वैद्यकीय अधिकारी डॉ. शीतल धनवडे, मोसीन मुजावर, रफिक मोमीन, भरत आडसुळे यांच्या पथकाद्वारे येथे तपासणी करण्यात आली. गरजू रुग्णांना तत्काळ मोफत औषधेही देण्यात आली.