लोकसभा निवडणुकीच्या प्रचारात गुजरातचा उदो उदो होत असला तरी विकासात महाराष्ट्रच देशात एक नंबरचे राज्य असल्याचे सांगत दिखाऊ प्रचार करून जनमतावर परिणाम होत नाही. असे गृहमंत्री आर. आर. पाटील यांनी शुक्रवारी खानापूर, विटा, परिसरातील दौ-यावेळी सांगितले. पाटील यांनी गारपिटीने नुकसान झालेल्या द्राक्षबागांची आज पाहणी केली.
लोकसभा निवडणुकीत गुजरातने प्रत्येक क्षेत्रात विकास केल्याचा गवगवा केला जात आहे.  मात्र औद्योगिक व कृषिक्षेत्रात राष्ट्रीय पातळीवरील विकासाची आकडेवारी पाहिली तर आजही महाराष्ट्रच देशात प्रथम क्रमांकावर असल्याचे आढळून येते. हायटेक प्रचार यंत्रणा राबवून अथवा भूलभुलैया प्रचार करून जनमतावर प्रभाव टाकता येत नाही असेही पाटील यांनी सांगितले.  
गारपीटग्रस्तांना मदत देण्यासाठी प्रसंगी निवडणूक आयोगाची परवानगी घेऊन नसíगक आपत्ती साहाय्य करण्याची जबाबदारी शासन निश्चितपणे पार पाडेल. केंद्र सरकारनेही गारपीटग्रस्त भागात झालेल्या नुकसानीची पाहणी करण्यासाठी केंद्रीय पथक पाठवावे अशी आपण मागणी करणार असल्याचे सांगून पाटील म्हणाले, की केंद्र शासनाकडूनसुद्धा नसíगक आपत्तीत सापडलेल्या शेतक-यांना मदत मिळवून देण्याचे प्रयत्न केले जातील. या दौ-यात गृहमंत्री आर. आर. पाटील यांच्या शोधात सोबत सुहास बाबर, रामराव पाटील हे होते. पाटील यांनी करंजी, पळशी येथील गारपिटीमुळे उद्ध्वस्त झालेल्या द्राक्षबागांची पाहणी केली.