नाशिकच्या जिल्हा रूग्णालय परिसरात एका बाळाचा प्रसूतीदरम्यान मृत्यू झाला. या बाळाचा मृतदेह त्याच्याच नातेवाईकांनी फेकून दिला. ज्यानंतर या मृतदेहाचा लचके कुत्र्यांनी तोडल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. नाशिक येथील जिल्हा रूग्णालयात पाच दिवसांपूर्वी एका महिलेची प्रसूती झाली, पण या दरम्यानच बाळाचा मृत्यू झाला. बाळाच्या मृत अर्भकावर अंत्यसंस्कार करण्याऐवजी ते त्याच्या नातेवाईकांनी जिल्हा रूग्णालय आवारातच फेकले.

मृत अर्भक जिल्हा रूग्णालयाच्या आवारातच फेकल्याने परिसरातील कुत्र्यांनी त्याचे लचके तोडले. मृत अर्भकावर अंत्यसंस्कार करण्याऐवजी त्याला त्याच्या नातेवाईकांनी फेकून का दिले हे अद्याप समजू शकलेले नाही. नाशिक जिल्हा रूग्णालय परिसरात भटक्या कुत्र्यांचा वावर जास्त प्रमाणात आहे. त्याचमुळे या मृत अर्भकाचे कुत्र्यांनी लचके तोडले आहे. हृदय पिळवटून टाकणारी ही घटना समोर आली आहे. या संदर्भात पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.