08 August 2020

News Flash

सोलापुरात मिरवणुकांतील डॉल्बी यंत्रणा जप्त

‘गुन्हे करणाऱ्यांनो सावधान, सेनगावकर आले आहेत’, असा संदेश देत सोलापुरात रुजू झालेले नवे पोलीस आयुक्त रवींद्र सेनगावकर यांनी आपल्या प्रशासनाची चुणूक दाखवायला लगेचच सुरूवात केली

| May 22, 2015 03:15 am

‘गुन्हे करणाऱ्यांनो सावधान, सेनगावकर आले आहेत’, असा संदेश देत सोलापुरात रुजू झालेले नवे पोलीस आयुक्त रवींद्र सेनगावकर यांनी आपल्या प्रशासनाची चुणूक दाखवायला लगेचच सुरूवात केली आहे. त्यांच्या प्रशासनाचा झटका ध्वनिप्रदूषण करून पर्यावरण धोक्यात आणणाऱ्या महाराणा प्रताप जयंती मिरवणुकींना बसला. मिरवणुकीत डॉल्बीचा वापर करून ध्वनिप्रदूषण केल्यामुळे तीन मंडळांविरूध्द गुन्हे दाखल करताना डॉल्बी यंत्रणाही जप्त करण्यात आली.
शहरात महाराणा प्रताप जयंतीचा उत्सव गेल्या चार दिवसांपासून साजरा केला जात होता. काल बुधवारी रात्री मिरवणुकीने जयंती उत्सवाचा समारोप करताना संयोजक मंडळांनी डॉल्बी व लेसर यंत्रणेचा वापर केला होता. पर्यावरण धोक्यात आणत दणदणाट करणाऱ्या डॉल्बीने मोठय़ा प्रमाणात ध्वनिप्रदूषण होते. मिरवणुका सुरू होऊन डॉल्बीच्या दणदणाटासह पुढे सरकत असताना पुढे काही अंतरावर पोलिसांनी त्यात हस्तक्षेप करीत डॉल्बी यंत्रणा बंद करण्यास संयोजकांना भाग पाडले. इतकेच नव्हे तर डॉल्बी यंत्रणा जप्त करून ती पोलीस ठाण्यात आणून लावण्यात आली.
चौपाड बालाजी मंदिरावळील महाराणा प्रताप जयंती मंडळाचे अध्यक्ष रोहितसिंह किशोर परदेशी (रा. उत्तर कसबा) व डॉल्बी यंत्रणेचे चालक अमीनसाहेब दुरूगकर (रा. शुक्रवार पेठ, सोलापूर) यांच्याविरूध्द फौजदार चावडी पोलिसांनी गुन्हा दाखल केला व डॉल्बी यंत्रणा जप्त केली. तसेच बेगम पेठेत महाराणा प्रताप जयंती मंडळाचे अध्यक्ष विनोद राम पवार (रा. मड्डी वस्ती, सोलापूर) व डॉल्बीचालक शाहबाझ हनीफ रंगरेज (रा. शुक्रवार पेठ, सोलापूर) यांच्या विरूध्द खटला दाखल करून डॉल्बी यंत्रणा जप्त करण्यात आली. याशिवाय सदर बझार पोलीस ठाण्याच्या हद्दीतील भगतसिंग चौकात महाराणा प्रताप जयंती मंडळाने मिरवणुकीत डॉल्बीचा वापर करून प्रचंड प्रमाणात ध्वनिप्रदूषण केल्याने या मंडळाच्या अध्यक्ष स्वाती किसनसिंह मन्सावाले व डॉल्बी यंत्रणाचालक संजय भारत कल्लावाले (रा. हुच्चेश्वरनगर, सोलापूर) या दोघांविरूध्द गुन्हा दाखल करण्यात आला. तसेच डॉल्बी यंत्रणा जप्त करून सदर बझार पोलीस ठाण्यात आणली गेली.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on May 22, 2015 3:15 am

Web Title: dolby system seized during the immersion procession in solapur
टॅग Solapur
Next Stories
1 आजपासून ऑनलाइन अर्ज स्वीकारणार
2 पाण्यासाठी महिलांचा हंडामोर्चा
3 दोन जिल्ह्यांच्या हद्दीचा फायदा उठवत ४६ हजार ब्रास वाळूची चोरी
Just Now!
X