10 August 2020

News Flash

जेजुरीच्या जत्रेत काठेवाडी गाढवांना भाव!

श्रीक्षेत्र जेजुरी येथे सालाबादप्रमाणे सुरू असलेल्या पौष पौर्णिमेच्या यात्रेत तब्बल १२०० गाढवांची विक्री झाली आहे.

| January 5, 2015 02:51 am

श्रीक्षेत्र जेजुरी येथे सालाबादप्रमाणे सुरू असलेल्या पौष पौर्णिमेच्या यात्रेत तब्बल १२०० गाढवांची विक्री झाली आहे. या विक्रीतून एक कोटी रुपयांची उलाढाल झाली आहे. यात्रेतील ही आजवरची सर्वात मोठी उलाढाल आहे. काठेवाडी गाढवांना सर्वात जास्त मागणी होती. प्रत्येकी २० हजार रुपये असा दर काठेवाडी गाढवांना मिळाला, तर गावठी गाढवांची विक्री आठ ते दहा हजार रुपये दराने झाली.
गाढवांची निवड..
*गाढवाचे दात, रंग पाहून किंमतनिश्चिती
*दोन दातांच्या गाढवांना दुवान, चार दातांच्या गाढवांना चौवान, कोरा, अखंड जवान असे संबोधन
*जेजुरीत पौष पौर्णिमेच्या यात्रेच्या निमित्ताने बंगाळी पटांगणात गाढव बाजार भरवण्याची परंपरा आहे. त्यासाठी गुजरात व राजस्थानातून मोठय़ा प्रमाणात गाढवाचे व्यापारी येतात. डोंगराळ भागांतील कामांसाठी, वाहतुकीसाठी गाढवांची मागणी जास्त आहे. त्यामुळे राज्यातून मोठय़ा प्रमाणात खरेदीदार येतात.
*या बाजारात खरेदीसाठी प्रामुख्याने वैदू, कोल्हाटी, मदारी, कुंभार, गारुडी व इतर भटक्या विमुक्त समाजातील बांधव येतात. येथील व्यवहार खंडोबाच्या साक्षीने उधारीचे होतात. पुढील वर्षी पसे देण्याचा शब्द दिला जातो. कोणत्याही प्रकारची लिखापढी न करता आजही हे व्यवहार सुरळीत चालू आहेत.
*गाढवांचा बाजार परंपरेप्रमाणे भरला असला तरी, येथील एका अनिष्ट परंपरेला यंदा छेद देण्यात आला. जेजुरीत पौष पौर्णिमेला वैदू समाज व भातू कोल्हाटी समाजाच्या जात पंचायतीचे पारंपरिक आखाडे भरले जात असत. परंतु याला बंदी घातल्याने यंदाही येथे कुठल्याही जात पंचायती भरलेल्या नाहीत.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on January 5, 2015 2:51 am

Web Title: donkey market at jejuri
Next Stories
1 दुष्काळग्रस्त, गारपीटग्रस्तांसाठी मंत्र्यांचा आश्वासनांचा पाऊस
2 धनगर समाजाला आरक्षण कायदेशीर बाबी तपासूनच
3 दुष्काळावर चर्चेसाठी काँग्रेसची आज बैठक
Just Now!
X