News Flash

महाराष्ट्राची तुलना कोणत्याही राज्याशी नव्हे तर प्रगत राष्ट्रांशी व्हावी – मुख्यमंत्री

महाराष्ट्राचा विकास इतर राज्यांच्या कित्येक पटीने असून, आता देशातील इतर राज्यांशी महाराष्ट्राची तुलना नको तर, येथील प्रगतीची तुलना इंग्लंड, फ्रान्स, जर्मनी अशा प्रगत राष्ट्रांशी होईल,

| September 15, 2014 02:40 am

महाराष्ट्राचा विकास इतर राज्यांच्या कित्येक पटीने असून, आता देशातील इतर राज्यांशी महाराष्ट्राची तुलना नको तर, येथील प्रगतीची तुलना इंग्लंड, फ्रान्स, जर्मनी अशा प्रगत राष्ट्रांशी होईल, असा दावा मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी केला.
येथे महिला मेळाव्यात ते बोलत होते. काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष आमदार आनंदराव पाटील, डॉ. सविता मोहिते, माजी नगराध्यक्षा शारदा जाधव, अर्चना पाटील, कराड पालिकेतील विरोधी पक्षनेत्या स्मिता हुलवान, जिल्हा परिषद सदस्य विद्या थोरवडे यांची उपस्थिती होती. दरम्यान, मुख्यमंत्री आजी, माजी नगरसेवक व प्रमुख नेते व कार्यकर्त्यांना आवर्जुन भेटून संवाद साधणार आहेत.  
चव्हाण पुढे म्हणाले, की सध्या राज्यातील जनतेचा कल पाहता विधानसभा निवडणुकीत काँग्रेस आघाडीचीच सत्ता येणार आहे. राज्यातील जनतेने मुख्यमंत्री म्हणून आपल्याला पसंती दिल्याने आणखी जोमाने काम करण्याची प्रेरणा मिळाली असून, उत्साह वाढला आहे. महाराष्ट्राला झोपडपट्टीमुक्त करण्याचा आपला निर्धार असून, कराडला उत्कृष्ट शहर बनवण्यासाठी आपण कटिबध्द आहे. तरी, राज्याच्या व कराडच्या विकासासाठी साथ द्या, असे आवाहन त्यांनी केले.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on September 15, 2014 2:40 am

Web Title: dont compare of maharashtra to other state cm prithviraj chavan
Next Stories
1 मिरज, पलूस, कडेगावात सभापतिपदी दिलीप बुरसे, विजय कांबळे, रंजना पवार
2 पक्षत्याग करून भाजपामध्ये जाणाऱ्या नेत्यांवर आबांची टीका
3 पाऊस अगदीच ओसरल्याने ‘कोयने’तून विसर्ग पूर्णत: बंद
Just Now!
X