16 December 2017

News Flash

जिल्हा परिषदेच्या वर्गखोलीस संशयास्पद आग

शहरातील तीन लकडी प्राथमिक शाळेतील सहावीच्या वर्गाचा दरवाजा अज्ञात व्यक्तींनी पेटविल्याने दरवाज्यासह वर्गात असलेली

इगतपुरी | Updated: December 27, 2012 4:52 AM

शहरातील तीन लकडी प्राथमिक शाळेतील सहावीच्या वर्गाचा दरवाजा अज्ञात व्यक्तींनी पेटविल्याने दरवाज्यासह वर्गात असलेली कागदपत्रे जळून भस्मसात झाली. या वर्गखोली लगतच्या कृषी कार्यालयातील कागदपत्रेही जाळण्याचा प्रयत्न झाला. एकूणच या प्रकाराबद्दल संशय व्यक्त केला जात असून शिक्षकांनी या प्रकरणी पोलिसात तक्रार दिली आहे.
जिल्हा परिषदेची तीन लकडी प्राथमिक शाळा नगरपालिकेच्या इमारतीत भरते. त्या इमारतीत कृषी खात्याचे कृषी अ‍ॅग्रो सेंटर आहे. सातवीपर्यंत वर्ग असणाऱ्या शाळेत विजेची कोणतीही सोय नसल्याने इमारतीत अंधाराचे साम्राज्य असते. सोमवारी रात्रीच्या सुमारास कृषी विभागासह वर्ग खोलीला कोणीतरी आग लावली असावी, असा संशय व्यक्त होत आहे. आगीत वर्गातील महत्त्वाचे दस्तावेज व लाकडी कपाड जळून खाक झाले. ही बाब सकाळी शिक्षकांच्या निदर्शनास आल्यानंतर त्यांनी इगतपुरी पोलीस ठाण्यात धाव घेऊन तक्रार दिली. या प्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

First Published on December 27, 2012 4:52 am

Web Title: doubtful fire in classroom of school
टॅग Crime,Fire,School