News Flash

सोलापुरात डॉ. आंबेडकर जयंतीला प्रारंभ

महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंती उत्सवाला सोलापूर शहर व परिसरात सोमवारी मोठय़ा उत्साहाने प्रारंभ झाला. शहरातील पार्क चौकात तसेच बुधवार पेठेतील डॉ. आंबेडकर उद्यानातील

| April 14, 2014 03:42 am

महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंती उत्सवाला सोलापूर शहर व परिसरात सोमवारी मोठय़ा उत्साहाने प्रारंभ झाला. शहरातील पार्क चौकात तसेच बुधवार पेठेतील डॉ. आंबेडकर उद्यानातील महामानवाच्या पुतळ्यास अभिवादन करण्यासाठी रविवारी मध्यरात्रीपासून आंबेडकरी जनतेची प्रचंड गर्दी झाली होती. तर शहर व परिसरात शेकडो सार्वजनिक मंडळांनी डॉ. आंबेडकर यांच्या प्रतिमांची प्रतिष्ठापना केली. येत्या रविवारी भव्य मिरवणुकीने या जयंती उत्सवाचा समारोप होणार आहे.
शहराल बुधवार पेठ, न्यू बुधवार पेठ, मिलिंद नगर, पांजरापोळ चौक, फॉरेस्ट, विजापूर नाका झोपडपट्टी परिसर, कुमठा नाका-संजय गांधी झोपडपट्टी, देगाव नाका, लष्कर, शास्त्रीनगर आदी भागात डॉ. आंबेडकर जयंतीनिमित्त सार्वजनिक मंडळांनी डॉ. बाबासाहेबांच्या प्रतिमा तथा पुतळ्यांची प्रतिष्ठापना केली असून परिसरात विद्युत रोषणाई केली आहे.
बुधवार पेठेतील जी. एम. मागासवर्गीय सामाजिक संस्थेच्या वतीने सम्राट चौकातील रावजी सखाराम प्रशालेच्या प्रांगणात डॉ. आंबेडकरांची पन्नास फुटी रांगोळी काढण्यात आली आहे. कराड येथील रयत शिक्षण संस्थेच्या शाळेतील कलाशिक्षक प्रताप जगताप यांनी चार दिवस मेहनत घेऊन रांगोळीद्वारे डॉ. बाबासाहेबांच्या सुरेख चित्राचा आविष्कार साकार केला. त्यासाठी ३०० किलो रांगोळी व ५० किलो रंग वापरण्यात आला.
सकाळी पार्क चौकात डॉ. आंबेडकर पुतळ्यास पुष्पहार व पुष्पचक्र अर्पण करण्यासाठी हजारो आंबेडकरी जनतेसह विविध राजकीय पक्षाचे नेते, सामाजिक, शैक्षणिक, सांस्कृतिक संघटनांचे कार्यकर्त्यांची गर्दी झाली होती. सोलापूर लोकसभा निवडणुकीतील काँग्रेसचे उमेदवार तथा केंद्रीय गृहमंत्री सुशीलकुमार शिंदे यांनी पार्क चौकात धाव घेऊन डॉ. आंबेडकर पुतळ्यास पुष्पहार अर्पण केला. या वेळी त्यांच्या समवेत आमदार प्रणिती शिंदे, आमदार दिलीप माने, माजी आमदार विश्वनाथ चाकोते, महापौर अलका राठोड आदी उपस्थित होते. भाजपचे उमेदवार शरद बनसोडे यांनीही डॉ. बाबासाहेबांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले. बुधवार पेठेतील डॉ. आंबेडकर उद्यानातही डॉ. बाबासाहेबांच्या पुतळ्याला अभिवादन करण्यासाठी गर्दी उसळली होती.
डॉ. आंबेडकर जयंतीचे औचित्य साधून विविध सामाजिक व सांस्कृतिक मंडळांनी विविध उपक्रम हाती घेतले आहेत. सम्यक मंडळाच्या वतीने मिलिंद बौद्धिक व्याख्यानमाला तर ड्रीम फाउंडेशनच्या वतीने विद्यार्थ्यांसाठी सलग १८ तास अभ्यास करण्याचा उपक्रम हाती घेण्यात आला. फाउंडेशनचे प्रमुख काशीनाथ भतगुणकी व त्यांच्या सहका-यांनी आयोजिलेल्या या उपक्रमाचे स्वागत करण्यात आले.
 

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on April 14, 2014 3:42 am

Web Title: dr ambedkar jayanti start in solapur 2
Next Stories
1 सोलापुरात डॉ. आंबेडकर जयंतीला प्रारंभ
2 सुशीलकुमारांना घरी बसवून सोलापूरकरांनी क्रांती घडवावी
3 आयोगाने ताणून धरल्याने पवार व्याकूळ- दिवाकर रावते
Just Now!
X