News Flash

आंबेडकर साखर कारखाना निवडणुकीचे आज मतदान

डॉ. बाबासाहेब आंबेडकर सहकारी साखर कारखाना संचालक मंडळाच्या निवडणुकीसाठी उद्या (रविवारी) मतदान होणार आहे.

| March 8, 2015 01:49 am

सौरऊर्जा प्रकल्प कार्यान्वित करणारा देशातील पहिला सहकारी साखर कारखाना म्हणून लौकिक मिळविलेल्या उस्मानाबाद तालुक्यातील केशेगाव येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर सहकारी साखर कारखाना संचालक मंडळाच्या निवडणुकीसाठी उद्या (रविवारी) मतदान होणार आहे. कार्यक्षेत्रातील ९ हजार ७९२ सभासद शेतकरी मतदानाचा हक्क बजावतील. कारखाना निवडणुकीसाठी प्रशासनाने तयारी पूर्ण केली असून, ९९ मतदान केंद्रांवर एकूण १५० कर्मचाऱ्यांची नियुक्ती केली आहे.
विद्यमान अध्यक्ष अरिवद गोरे यांना अॅड. व्यंकट गुंड व भाजपचे संजय िनबाळकर यांनी स्वतंत्र पॅनेल उभारून आव्हान दिले. प्रचारकाळात गोरे यांच्या कारभारावर सडकून टीका करीत वातावरण तापविण्यात आले. भाजपच्या पॅनेलसोबत लोकमंगल समूहाचे अध्यक्ष आमदार सुभाष देशमुख, रोहन देशमुख यांनीही प्रचारात उडी घेतली.
जिल्ह्यातील सर्वोत्कृष्ट कारखाना म्हणून राज्य पातळीवर वेळोवेळी आंबेडकर कारखान्याचे कौतुक झाले. कारखाना उभारणीपासून आजपर्यंत अध्यक्ष गोरे यांनी एकहाती सत्ता कायम राखली. यापूर्वीही विरोधकांनी जंगजंग पछाडले असता गोरे यांच्या विरोधात त्यांना यश आले नाही. आताही पुन्हा सर्व विरोधक निवडणुकीसाठी एकवटले. मात्र, भाजप व शिवसेनेतील स्थानिक बेबनाव या वेळीही उफाळून आला. काँग्रेसच्या पॅनेलला सहकार्य करीत सेनेने भाजपपासून चार हात लांब राहणे पसंत केले, तर भाजपनेही आपले स्वतंत्र पॅनेल उभे केले. काही माजी संचालकांना भाजपने उमेदवारी बहाल केली. मंगळवारी (दि. १०) सकाळी ८ वाजता तहसील कार्यालयात मतमोजणी होईल.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on March 8, 2015 1:49 am

Web Title: dr ambedkar sugar factory today voting
टॅग : Sugar Factory
Next Stories
1 ‘बेळगाव’च्या महापौरपदी किरण सायनाक, उपमहापौरपदी मीना वाझ
2 अमित शाह यांची संघाच्या ज्येष्ठ नेत्यांशी चर्चा
3 महालक्ष्मी देवस्थान विकासाचा २५० कोटींचा आराखडा
Just Now!
X