News Flash

डॉ दिलीप म्हैसेकर यांची आरोग्य विज्ञान विद्यापीठाच्या कुलगुरूपदी निवड

डॉ म्हैसेकर यांची नियुक्ती पाच वर्षांच्या कार्यकाळासाठी करण्यात आली आहे.

येथील डॉ शंकरराव चव्हाण शासकीय वैद्यकीय महाविद्यालचे प्रभारी अधिष्ठाता तसेच पल्मोनरी मेडिसिन विभागाचे विभाग प्रमुख डॉ दिलीप गोविंदराव म्हैसेकर यांची नाशिक येथील महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठाच्या कुलगुरूपदी आज नियुक्ती करण्यात आली.
राज्यपाल तथा कुलपती चे विद्यासागर राव यांनी रविवारी निवड समितीने शिफारस केलेल्या उमेदवारांच्या मुलाखती घेतल्यानंतर डॉ दिलीप म्हैसेकर यांच्या नावाची घोषणा केली. डॉ म्हैसेकर यांची नियुक्ती पाच वर्षांच्या कार्यकाळासाठी करण्यात आली आहे. डॉ अरुण जामकर यांचा कार्यकाळ २० डिसेंबर रोजी संपल्यामुळे हे पद रिक्त झाले होते. एकनाथ डवळे प्रभारी कुलगुरू म्हणून या पदाचा कार्यभार सांभाळीत होते.
डॉ दिलीप म्हैसेकर (जन्म १२ जुलै १९६०) यांनी १९८४ साली औरंगाबादच्या शासकीय महाविद्यालयातून एमबीबीएस ही पदवी प्राप्त केली. तर १९८९ साली मुंबईच्या जी एस वैद्यकीय महाविद्यालयातून (क्षयरोग व छातीचे विकार) या विषयात एमडी केले. डॉ म्हैसेकर यांना अध्यापन, संशोधन व प्रशासनाचा व्यापक अनुभव असून त्यांचे संशोधन निबंध राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय प्रकाशनात प्रसिद्ध झाले आहेत.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on February 7, 2016 4:40 pm

Web Title: dr dilip mhaisekar selected vice chancellor of health science university
Next Stories
1 सहकारमंत्री चंद्रकांत पाटील यांच्या फॅन्सी नंबर प्लेटच्या गाडीवर कारवाई होणार – रावते
2 शनिशिंगणापूरचा वाद मुख्यमंत्र्यांकडे
3 श्रीमंती खेळासाठी हजारो वृक्षांची कत्तल?
Just Now!
X