News Flash

बीजिंगमधील मिसेस वर्ल्ड स्पर्धेत डॉ. ईलाक्षी मोरे-गुप्ता उपविजेती

गेल्या २६ नोव्हेंबर ते ४ डिसेंबर दरम्यान ही स्पर्धा बीजिंगमध्ये झाली

बीजिंगमधील मिसेस वर्ल्ड स्पर्धेत डॉ. ईलाक्षी मोरे-गुप्ता या मराठमोळ्या वैदर्भीय कन्येने उपविजेतेपद पटकावून अटकेपार झेंडा रोवला आहे. सोबतच तिने ‘फेस ऑफ आशिया’ हा पुरस्कार स्वतंत्रपणे पटकावला.

गेल्या २६ नोव्हेंबर ते ४ डिसेंबर दरम्यान ही स्पर्धा बीजिंगमध्ये झाली. लेबनॉनच्या सौभाग्यवतीने पहिला, तर भारताच्या ईलाक्षीने द्वितीय स्थानावर मजल मारली. हा अत्यंत आनंदाचा क्षण असून भारताचे जागतिक पातळीवर प्रतिनिधित्व केल्याबद्दल अभिमान वाटतो, अशी सार्थ प्रतिक्रिया ईलाक्षीने बीजिंगवरून भ्रमणध्वनीद्वारे लोकसत्ताशी बोलतांना दिली. येथील हॉटेल व्यावसायिक शैलेंद्र गुप्ता यांची स्नुषा असलेली ईलाक्षी ही अकोला येथील डॉ.मीना व डॉ.शशिकांत मोरे यांची कन्या आहे. तिने बी.डी.एस. ही पदवी मेघे अभिमत विद्यापीठाच्या शरद पवार दंत महाविद्यालयातून २०१३ मध्ये घेतली. पुढे २०१४ मध्ये नागपूरच्या एन.के.जी साळवे वैद्यकीय महाविद्यालयातून पदव्युत्तर शिक्षण घेणारी ईलाक्षी तीन वर्षांंपूर्वी डॉ.अनिकेत गुप्ता यांच्याशी विवाहबध्द झाली. ती व तिचे पती पुण्याला जहांॅगीर हॉस्पिटलमध्ये कार्यरत आहेत.

या स्पर्धेत ५३ देशातील सौभाग्यवती सहभागी झाल्या होत्या. २६ नोव्हेंबरपासून विविध फे ऱ्या झाल्यावर पाच जणींची निवड झाली. पहिल्या तिघींना एक समान प्रश्न विचारण्यात आले. तुमचे आवडते फु ल कोणते व का? यावर ईलाक्षीने तिचे कमळ हे आवडते फु ल असल्याचे उत्तर दिले. केवळ राष्ट्रीय प्रतीक म्हणूनच नव्हे, तर कमळ हे पावित्र्यदर्शक फू ल आहे. ते सकारात्मक संदेश देते. दलदलीत उगवते, पण कायम टवटवीत असते. माझा उगम नव्हे, तर फु लणे महत्वाचे, असा संदेश मला कमळातून दिसतो. या तिच्या उत्तरावर परीक्षकांचीही दाद मिळाली. गतवर्षी मिसेस इंडिया स्पर्धेत प्रथम आल्याने तिची जागतिक स्पर्धेसाठी निवड झाली. यापूर्वी २००१ मध्ये अदिती गोवित्रीकरने या अशा स्पर्धेत प्रथम पुरस्कार पटकावला होता.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on December 7, 2015 5:39 am

Web Title: dr ilakshi more gupta runner up in mrs world
Next Stories
1 किडनी तस्करीप्रकरणी सूत्रधारास अटक
2 अयोध्येत बाबरी मशीद पुन्हा उभी राहणार- ओवेसी
3 कर्जफेडीसाठी मूत्रपिंड विक्री!
Just Now!
X