गडचिरोलीतील गोंडवाना विद्यापीठाच्या कुलगुरूपदी डॉ. नामदेव कल्याणकर यांची नियुक्ती करण्यात आली आहे.

राज्यपाल आणि विद्यापीठांचे सी. विद्यासागर राव यांनी रविवारी डॉ. कल्याणकर यांची पाच वर्षांकरिता कुलगुरूपदी निवड जाहीर केली. डॉ. कल्याणकर नांदेडच्या नामांकित यशवंत महाविद्यालयाचे प्राचार्य आहेत. या विद्यापीठाचे पहिले कुलगुरू डॉ. विजय आईंचवार यांचा कार्यकाळ ५ मार्च, २०१४ला संपला. त्यानंतर डॉ. एम.जी. चांदेकर यांच्याकडे गोंडवाना विद्यापीठाच्या कुलगुरूपदाचा कार्यभार होता. डॉ. कल्याणकर यांनी १९५७ साली भौतिकशास्त्रात पीएच.डी. केली. २००३पासून ते यशवंत महाविद्यालयाचे प्राचार्य म्हणून कार्यरत आहेत. यशवंतराव चव्हाण मुक्त विद्यापीठाच्या संगणक विज्ञान अभ्यासक्रमाचे एम. फिल. संशोधक मार्गदर्शक म्हणूनही जबाबदारी सांभाळत आहेत.