22 November 2019

News Flash

डॉ नरेंद्र दाभोलकर प्रकरण: संजीव पुनाळेकर यांना सीबीआय कोठडी

आरोपींना शस्त्र नष्ट करण्याचा सल्ला देणारे वकील अॅड. संजीव पुनाळेकर यांना सीबीआय कोठडी सुनावण्यात आली आहे

महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे कार्याध्यक्ष डॉ. नरेंद्र दाभोलकर हत्या प्रकरणातील संशयित आरोपींना शस्त्र नष्ट करण्याचा सल्ला देणारे वकील अॅड. संजीव पुनाळेकर यांना २३ जूनपर्यंत सीबीआय कोठडी सुनावण्यात आली आहे. पुणे सत्र न्यायालयाने संजीव पुनाळेकर यांनी ही कोठडी सुनावली आहे. याआधी याच प्रकरणी ४ जूनपर्यंत संजील पुनाळेकर न्यायालयीन कोठडीत होते.

संजीव पुनाळेकर यांना पुन्हा सीबीआय कोठडी देण्याची मागणी सीबीआयकडून बुधवारी न्यायालयात करण्यात आली होती. संजीव पुनाळेकर यांच्या मोबाइल संचात असलेल्या माहितीचे तांत्रिक तपासात विश्लेषण करण्यात आले असता सीबीआयला काही महत्त्वाची माहिती मिळाली आहे. या प्रकरणाचा सखोल तपास करायचा असल्याने संजीव पुनाळेकर यांना पुन्हा सीबीआय कोठडी देण्यात यावी अशी विनंती विशेष सरकारी वकील अॅड. प्रकाश सुर्यवंशी यांनी न्यायालयात केली होती.

First Published on June 20, 2019 5:50 pm

Web Title: dr narendra dabholkar murder case sanjeev punalekar cbi custody sgy 87
Just Now!
X