News Flash

डॉ शितल आमटेंचा मोबाइल, लॅपटॉप व टॅब उघडण्यात अपयश; डोळे पासवर्ड असल्याने अधिकाऱ्यांची कसरत

तिन्ही वस्तू पुणे येथे न्याय वैद्यक प्रयोगशाळेत पाठवण्यात आल्या आहेत

संग्रहित

रवींद्र जुनारकर
आनंदवनच्या मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. शितल आमटे यांचा लॅपटॉप, मोबाइल व टॅब उघडण्यात मुंबईच्या न्यायवैद्यक प्रयोगशाळेला अपयश आले आहे. त्यामुळे आता मोबाइल, लॅपटॉप व टॅब पुणे येथे न्याय वैद्यक प्रयोगशाळेत पाठविण्यात आले आहेत. शितल यांच्या मृत्यूला साडेतीन महिन्यांचा अवधी पूर्ण झाला असताना व एक हायप्रोफाईल केस असतानाही पोलिसांना तपासात बराच वेळ लागत आहे.

आनंदवनच्या मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ शितल आमटे यांनी ३० नोव्हेंबर रोजी स्वत:च्या खोलीत इंजेक्शन घेवून आत्महत्या केली. ही आत्महत्या की अपघाती मृत्यू हे अद्याप स्पष्ट झालेले नाही. पोलीस अधिक्षक अरविंद साळवे यांनी डॉ.शितल यांचा मृत्यू श्वसननलिका बंद पडल्याने झाल्याचे सांगितले होते. तसेच त्यांचा लॅपटॉप, मोबाइल व टॅब मुंबई येथे न्यायवैद्यक प्रयोगशाळेत पाठविल्याचीही माहिती तेव्हा दिली होती. मात्र शितल यांचा मोबाईल, लॅपटॉप व टॅबचे लॉक उघडण्यात मुंबईच्या न्यायवैद्यक प्रयोगशाळेला अपयश आले आहे. शितल यांचे डोळे हेच त्यांच्या लॅपटॉप, टॅब व मोबाइलचा पासवर्ड होता. त्यांच्या मृत्यूनंतर हा पासवर्ड आता वापरता येणार नाही. त्यामुळे या तिन्ही वस्तू मुंबईला पाठविण्यात आल्या होत्या. मात्र मुंबई न्यायवैद्यक प्रयोगशाळेलाही त्यात अपयश आले आहे. शेवटी पुणे येथील न्यायवैद्यक प्रयोगशाळेत पाठविण्यात आल्या असल्याची माहिती पोलिस अधिक्षक अरविंद साळवे यांनी लोकसत्ताशी बोलतांना दिली.

विशेष म्हणजे पुणे येथे या गोष्टी पाठवून १५ दिवसापेक्षा अधिकचा कालावधी झालेला आहे. तरीही लॅपटॉप, मोबाईल व टॅब उघडण्यात न्यायवैद्यक प्रयोगशाळेला यश आलेले नाही. सध्या तरी या तिन्ही गोष्टींवर पोलिसांचं लक्ष्य केंद्रीत आहे. संबंधित मोबाइल कंपनी, लॅपटॉप कंपनीचे अभियंतेही लॉक उघडू शकले नाही अशीही माहिती समोर येत आहे. जोवर लॅपटॉप, मोबाईल उघडत नाही तोवर बऱ्याच गोष्टींची स्पष्टता होणार नाही असेही पोलीस अधिक्षक साळवे म्हणाले. पुणे येथील प्रयोगशाळा लॉक उघडण्याचा प्रयत्न करित असल्याचे त्यांनी सांगितले.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on March 20, 2021 8:28 am

Web Title: dr shital amte suicide case police trying to open laptop mobile tab sgy 87
Next Stories
1 सांगली-जळगावातील करेक्ट कार्यक्रम ही तर नांदी: शिवसेनेचा भाजपाला इशारा
2 स्थानक परिसरात दुचाकींचे विद्रूपीकरण
3 हातगाड्यांमुळे भाजी मंडईची कोंडी
Just Now!
X