31 May 2020

News Flash

डॉ. सुषमा पाटीलसह तीन डॉक्टरांना अटक

सांगलीच्या श्री मॅटíनटी हॉस्पिटलमधील बेकायदा गर्भपातप्रकरणी मुख्य डॉ. सुषमा पाटीलसह तीन डॉक्टरांना पोलिसांनी अटक केली असून, त्या तिघांना एक दिवस पोलीस कोठडीत ठेवण्याचे आदेश शुक्रवारी

| August 23, 2014 04:10 am

सांगलीच्या श्री मॅटíनटी हॉस्पिटलमधील बेकायदा गर्भपातप्रकरणी मुख्य डॉ. सुषमा पाटीलसह तीन डॉक्टरांना पोलिसांनी अटक केली असून, त्या तिघांना एक दिवस पोलीस कोठडीत ठेवण्याचे आदेश शुक्रवारी न्यायालयाने दिले. या प्रकरणातील एक डॉक्टर अद्याप फरार झाला असल्याचे पोलिसांनी सांगितले. आंबेडकर रोडवर असणाऱ्या श्री मॅटíनटी हॉस्पिटलमध्ये १०७ गर्भपात झाल्याचे प्रकरण उघडकीस येताच महापालिकेच्या आरोग्याधिकारी रोहिणी कुलकर्णी यांनी शहर पोलीस ठाण्यात सुषमा पाटील, अर्जुन पाटील या डॉक्टर पती-पत्नीसह माधुरी जाधव आणि संतोष पाटील या चार डॉक्टरांविरुद्ध तक्रार दाखल केली आहे.
    पोलिसांनी आज डॉक्टर पाटील पती-पत्नीसह माधुरी जाधव या तिघांना अटक केली. या तिघांना उद्यापर्यंत (शनिवार) पोलीस कोठडीत ठेवण्याचे आदेश न्यायालयाने दिले आहेत. मात्र या प्रकरणातील चौथे संशयित असणारे डॉ. संतोष जयपाल पाटील हे फरारी झाले असल्याचे पोलिसांनी सांगितले.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on August 23, 2014 4:10 am

Web Title: dr sushma patil arrested with three doctors
टॅग Arrested,Doctors,Sangli
Next Stories
1 वसंतदादा पतसंस्थेत १ कोटीचा अपहार
2 अर्बन बँकेच्या मल्टिस्टेट दर्जावर शिक्कामोर्तब!
3 प्रवासी महिलांना लुटणारी टोळी जेरबंद
Just Now!
X