राज्यातील हातगाड्यांवर अन्न पदार्खांची विक्री करणाऱ्यांना आता ड्रेसकोड लागू करण्यात येणार आहे. सध्या या मोहिमेची सुरूवात झाली करण्यात आली असून सुरूवातील बीडची निवड करण्यात आली आहे. अन्न व औषध प्रशासन मंत्री डॉ. राजेंद्र शिंगणे यांच्या पुढाकारातून ही मोहिम राबवण्यात येत आहे.

शिंगणे यांनी बीडमधील एका ठिकाणी हातगाडीवर खाद्यपदार्थांची विक्री करणाऱ्यांना नव्या ड्रेसचं वाटप केलं आहे. नव्या ड्रेसकोडमध्ये टोपी, हँडग्लोज आणि अॅप्रनचा समावेश आहे. तसंच खाद्यपदार्थ विक्रेत्यांचीही स्वच्छतेच्या दृष्टीनं तपासणी करण्यात येत आहे. याव्यतिरिक्त त्यांचे परवानेही तपासण्यात येत आहेत. दरम्यान, या हातगाड्यांवर सर्वांना स्वच्छ आणि उत्तम दर्जाचे पदार्थ मिळावे यासाठी अन्न व औषध प्रशासनातर्फे यापुढेही हातगाड्या तपासण्याची मोहिम राबवण्यात येणार आहे.

तसेच गाड्यांवर खाद्यपदार्थ विक्रेत्यांना कोणत्याही प्रकारचा त्वचा विकार आहे का किंवा नाही हे तपासण्यासाठी अधिकाऱ्यांना सूचना देण्यात आल्या आहेत. यापुढे कोणतेही खाद्यपदार्थ देण्यापूर्वी त्यांना हॅडग्लोज वापरणं अनिवार्य करण्यात आलं आहे. तसंच त्याचा वापर न करणाऱ्या विक्रेत्यांविरोधात एक रूपया ते एक लाखांपर्यंत दंडात्मक कारवाई करण्यात येणार असल्याचंही त्यांनी नमूद केलं.