News Flash

यवतमाळ हादरले! पाच जणांचा सॅनिटायझर प्यायल्याने मृत्यू

तिघांची प्रकृती चिंताजनक; मृतांचा आकडा वाढण्याची भीती

सॅनिटाझर पिल्याने चौघांचा मृत्यू झाला आहे. (प्रातिनिधिक छायाचित्र । रॉयटर्स)

राज्यात करोनाच्या दुसऱ्या लाटेनं थैमान घातलं आहे. विषाणूच्या नवीन स्ट्रेनमुळे प्रचंड वेगाने प्रसार होत असून, राज्य सरकारने संसर्ग नियंत्रणात आणण्यासाठी लॉकडाउन लागू केला आहे. त्यामुळे अनेक जिल्ह्यांत दारु विक्रीवरही निर्बंध घालण्यात आलेले आहेत. यातूनच यवतमाळमध्ये भयंकर घटना घडली आहे. दारूची तलफ झाल्यानंतर काही जणांनी सॅनिटायझरचं प्राशन केलं. यात पाच जणांचा मृत्यू झाला असून, तिघांची प्रकृती गंभीर असल्याचं समोर आलं आहे.

यवतमाळ जिल्ह्यातील वणी गावात ही घटना घडली आहे. दारूचं व्यसन जडलेल्या काही जणांनी तलफ भागविण्यासाठी सॅनिटायझर प्यायले. यात पाच जणांचा मृत्यू झाला. यात तिघांचा घरी मृत्यू झाला आहे. तर दोघांचा रुग्णालयात मृत्यू झाल्याचं वृत्त आहे. लॉकडाउनमुळे दारूची दुकानं बंद आहेत. त्यामुळे त्यांनी सॅनिटायझरच प्यायले, अशी माहिती कुटुंबियांनी दिली. या घटनेतील इतर तिघांची प्रकृती अत्यवस्थ असून, मृतांचा आकडा वाढण्याची भीती व्यक्त केली जात आहे. दत्ता लांजेवार, नूतन पाथरटकर, गणेश नांदेकर, संतोष मेहर, सुनील ढेंगळे अशी पाच मृतांची नावं आहेत.

राज्यात अमरावती, नागपूर, यवतमाळ या जिल्ह्यांतून करोनाच्या दुसऱ्या लाटेचा उद्रेक झाला. या जिल्ह्यांमध्ये करोनाचं डबल म्युटेशन आढळून आलं आहे. त्यामुळे इथे प्रचंड प्रादुर्भाव झाला होता. त्यानंतर राज्यभरात विषाणूचं संक्रमण झालं. संसर्गाची साखळी तोंडण्यासाठी राज्य सरकारने लॉकडाउन जाहीर केला. तर यात अनेक जिल्ह्यांमध्ये दारूविक्रीवरही बंधनं घालण्यात आली.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on April 24, 2021 2:07 pm

Web Title: drink sanitizer yavatmal incident people died after drink sanitizer bmh 90
Next Stories
1 “खरा सचिन वाझे मंत्रालयाच्या सहाव्या मजल्यावर होता की सिल्वर ओकवर?”
2 दया, कुछ तो गडबड जरूर है; सीबीआयच्या कारवाईवर संजय राऊतांना शंका
3 राजकीय उद्दिष्टे साध्य करण्यासाठी देशमुखांवर धाडसत्र; जयंत पाटील यांनी सुनावलं
Just Now!
X