03 March 2021

News Flash

गाडीतील सॅनिटायझरने पेट घेतल्याने राष्ट्रवादीच्या नेत्याचा होरपळून मृत्यू

त्यांनी गाडीचे दरवाजे उघडण्याचा प्रयत्न केला मात्र त्यांना यश आलं नाही

(फोटो : Twitter/kajalsaini123)

मुंबई- आग्रा महामार्गावर गाडीला भीषण आग लागल्याने एका व्यक्तीचा होरपळून मृत्यू झाला आहे. गाडीमध्ये शॉर्टसर्कीटमुळे आग लागली. त्यातच गाडीत असणाऱ्या सॅनिटायझरने पेट घेतल्याचे सांगितले जात आहे. गाडीला आग लागल्यानंतर चालक संजय चंद्रभान शिंदे यांनी दरवाजा उघडण्याचा प्रयत्न मात्र गाडीचे दरवाजे जॅम झाल्याने ते गाडीत अडकून पडले. पाहता पाहता गाडीने पेट घेतला अन् त्यातच संजय यांचा दुर्देवी मृत्यू झाला. ही घटना साकोरी फाट्याजवळ मंगळवारी दुपारी सव्वाबाराच्या सुमारास घडल्याचे वृत्त टाइम्स ऑफ इंडियाने दिलं आहे. संजय शिंदे हे पिंपळगाव बसंतमधील राष्ट्रवादी काँग्रेसचे लोकप्रिय नेते होते.

पिंपळगाव बसंतच्या पोलिसांनी दिल्ल्या माहितीनुसार, शिंदे यांनी गाडीत शॉटसर्किट झाल्यानंतर ती रस्त्याच्या कडेला घेतली. मात्र त्यांना दरवाजा उघडता आला नाही. मुख्य हवालदार असणाऱ्या एकनाथ पवार यांनी दिलेल्या माहितीनुसार गाडीने पेट घेतल्यानंतर बघ्यांची गर्दी जमली. मात्र कोणालाही गाडीत आडकलेल्या व्यक्तीची मदत करता आली नाही. काही काळात घटनास्थळी अग्नीशामन दलाची गाडी पोहचली आणि आग विझवली मात्र तोपर्यंत शिंदे यांचा मृत्यू झाला होता. या प्रकरणात पोलिसांनी अपघाती मृत्यूची नोंद केली आहे.

शिंदे हे जगभर द्राक्ष निर्यातीसाठी प्रसिद्ध असलेल्या साकोरे येथील द्राक्ष निर्यातदार होते. साकोरेच्या उपसरपंच निर्मला शिंदे यांचे ते पती होते. द्रक्ष बागेच्या फवारणीसाठी लागणारी किटकनाशके घेण्यासाठी शिंदे साकोरे येथील निवासस्थानातून पिंपळगावकडे निघाले होते. त्यांच्या मारूती सियाज कारने साकोरा फाट्यावर महामार्गाला लागताच कादवा नदीच्या पुलाजवळ अचानक पेट घेतला. शॉर्ट सर्कीटमुळे गाडीचे दरवाजे जॅम झाले. कारमध्ये सॅनिटाझरची बाटलीसहीत डिझेल टाकी व लेदरचे सीट यासारखे ज्वलनशील पदार्थ असल्याने आगीची तीव्रता वाढली. रवाजे उघडण्याचा व काच फोडण्याचा शिंदे यांनी प्रयत्न केला, मात्र त्याचे प्रयत्न अपयशी ठरले.

राष्ट्रवादीच्या तालुका उपाध्यक्षपदाची जबाबदारी शिंदे यांच्याकडे होती. साकोरे गावच्या उपसरपंचपदी त्यांच्या पत्नी निर्मला शिंदे यांची दोन महिन्यापुर्वी निवड झाली होती. गावात विकासकामाचा संकल्प त्यांनी अनेकदा बोलुन दाखविला होता. एक चांगला नेता हरपल्याची हळहळ गावतील नागरिकांनी व्यक्त केली आहे. शिंदे यांच्या मागे आई, पत्नी, दोन मुले, सुना असा परिवार आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on October 15, 2020 7:57 am

Web Title: driver dies as car catches fire in maharashtra scsg 91
Next Stories
1 राज्यात पावसाचं धुमशान! पुण्यात धो धो; मुंबईसह कोकणात रेड अलर्ट
2 “घटनात्मक पदावरील व्यक्तीलाही बाळंतकळा याव्यात हे जरा गंभीर”; शिवसेनेचा राज्यपालांवर टीकेचा बाण
3 अंधारयात्रा संपुष्टात?
Just Now!
X