News Flash

खड्डय़ामुळे वाहनचालकाचा मृत्यू

यावल तालुक्यातील फैजपूरजवळ रस्त्यावरील खड्डय़ात दुचाकी गेल्याने एकाचा मृत्यू झाल्याची घटना गुरुवारी पहाटे घडली.

| February 6, 2015 06:09 am

यावल तालुक्यातील फैजपूरजवळ रस्त्यावरील खड्डय़ात दुचाकी गेल्याने एकाचा मृत्यू झाल्याची घटना गुरुवारी पहाटे घडली.
सूतगाव येथील रहिवासी रामभाऊ दगडू सोनवणे (५४) हे रेल्वे कर्मचारी बुधवारी मध्यरात्री भुसावळहून सूतगावकडे जात असताना कठोरा-कासवा रस्त्यावरील खड्डय़ात मोटारसायकल गेल्याने ते पडले. डोक्याला जबर मार लागल्याने ते जखमी अवस्थेत पहाटेपर्यंत घटनास्थळीच पडून होते. रस्त्याने फारशी वाहतूक नसल्याने त्यांच्याकडे कोणाचे लक्षही गेले नाही. पहाटे सहाच्या सुमारास काही वाहनधारकांच्या लक्षात हा अपघात आल्यानंतर त्यांनी सोनवणे यांना रुग्णालयात दाखल केले. परंतु अती रक्तस्रावामुळे त्यांचा मृत्यू झाला असल्याचे डॉक्टरांनी नमूद केले.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on February 6, 2015 6:09 am

Web Title: driver killed due to potholes
टॅग : Driver,Potholes
Next Stories
1 खोटय़ा इतिहासाला उत्तर सत्याने द्यायला हवे- डॉ. सदानंद मोरे
2 तृप्ती माळवी यांचा महापौरपद सोडण्यास नकार
3 ‘नेमाडेंनी मराठी साहित्याला जीवनदृष्टी दिली’
Just Now!
X