17 October 2019

News Flash

मराठवाडय़ातील दुष्काळाची दाहकता आणि आकडय़ांचा खेळ!

दुष्काळ पाचवीला पूजल्यासारखा येतो. उत्पादन घटते. सर्वसामान्य माणूस हैराण होतो.

|| सुहास सरदेशमुख

दुष्काळ पाचवीला पूजल्यासारखा येतो. उत्पादन घटते. सर्वसामान्य माणूस हैराण होतो. त्या कहाण्या अंगावर शहारे आणणाऱ्या असतात. टँकर फिरतो. कधी तो फिरवला जातो. विहिरीतील पाणी उपसा करण्यासाठी पैसे मोजले जातात. अर्थकारण आक्रसते. पण दुष्काळाची तीव्रता आणि व्यापकता समजून घेण्यासाठी सरकार आकडेवारी गोळा करते. त्या आकडय़ांच्या आधारेही दुष्काळ समजावून घ्यायला हवा. कारण आकडे दाहकता सांगायला पुरेसे ठरतात. म्हणूनच हा मराठवाडय़ातील साडेआठ हजार गावांतील दुष्काळ समजून घेण्यासाठी आकडेमोड

मराठवाडय़ातील दुष्काळ आकडेवारीत

१. पर्जन्यमान

 • १ जून ते ३१ ऑक्टोबर २०१८ – वार्षिक सरासरी ७७९ मि.मी. झालेले पर्जन्यमान-५०१.७४ मि.मी. (६४.४१ टक्के)
 • झालेले पर्जन्यमान जिल्हानिहाय – औरंगाबाद (५३.३४ टक्के), जालना (६१.७०), परभणी (६२.२९), हिंगोली (७५.२७), नांदेड (८०.९५), बीड (५०.१८), लातूर (६४.२८), उस्मानाबाद (५८.०६)
 • झालेले पर्जन्यमान तालुकानिहाय : ५० टक्क्यांपेक्षा कमी-११, ५० ते ७५ टक्के-४९, ७५ ते १०० टक्के-१४, १०० टक्क्यांच्यावर-दोन
 • झालेले पर्जन्यमान मंडळनिहाय : ५० टक्क्यांपेक्षा कमी-११९, ५० ते ७५ टक्के-१९४, ७५ ते १०० टक्के-८८, १०० टक्क्यांच्यावर-२०.
 • झालेले पर्जन्यमान महिनानिहाय : जून-१२२.६५ टक्के, जुलै-५६.३३, ऑगस्ट-९२.१५, सप्टेंबर-१३.६५, ऑक्टोबर-८.७६ टक्के.
 • १ जून ते ३१ ऑक्टोबर २०१८ : एकूण दिवस-१५३, पर्जन्यमानाचे दिवस-४१, कोरडे दिवस-११२
 • २. पाणी साठा (२८-१२-२०१८)
 • मोठे प्रकल्प- १९.६६ टक्के, मध्यम- ११.६९ टक्के, लघु- १०.७४ टक्के, एकूण पाणीसाठा- १६.८५ टक्के.

३. भूजल पातळी (सप्टेंबर २०१८)

 • मागील पाच वर्षांच्या सप्टेंबरमधील सरासरीच्या तुलनेत भूजल पातळीत घट झालेले तालुके- ५६४. पैसेवारी (खरीप २०१८)
 • हंगामी (३०-९-१८)- ५० पैसे खालील गावे-२९५८ (औरंगाबाद-१३३५, जालना-९५२, बीड-६७१)
 • सुधारित (३१.१०.१८)- ५० पैसे खालील गावे-६४५८ (औरंगाबाद-१३३९, जालना-९७१), परभणी-७५४), नांदेड-३०५, बीड-१४०२, लातूर-९५१, उस्मानाबाद-७३६)

५. पेरणी

 • खरीप (२८-०९-१८) सरासरी क्षेत्र-५००३६ हेक्टर, झालेली पेरणी-४८६०९.५४ हेक्टर (टक्केवारी-९७.१५)
 • रब्बी (२६-११-१८) सरासरी क्षेत्र-१८८६५.४० हेक्टर, झालेली पेरणी-६१६४.८१ हेक्टर (टक्केवारी-३२.६८)

६. पीक कर्ज वाटप

 • खरीप (३०-०९-१८) उद्दिष्ट-११९२७८४.८२(लाख) वाटप-४९१२३२.१७(लाख), टक्केवारी-४१.१८, सभासद-८६७०४३
 • ७. छत्रपती शिवाजी महाराज शेतकरी सन्मान योजना – लाभार्थी शेतकऱ्यांच्या खात्यावर वर्ग केलेली रक्कम -लाभार्थी शेतकरी संख्या- ९६१३३० (रक्कम कोटीत)- ३९७८.९३
 • ८. पंतप्रधान पीक विमा योजना खरीप २०१८-१९ (३१-०७-२०१८)
 • शेतकरी खातेदार संख्या-३४८२६४३, एकूण सहभागी शेतकरी संख्या-६६२९५६६, टक्केवारी-१९०.३६.
 • ९. टँकर-१०-०१-१९
 • एकूण-९५४ (औरंगाबाद-५६५, जालना-१३७, परभणी-०, नांदेड-२, बीड-२४०, लातूर-०, उस्मानाबाद-१०)

मागील पाच वर्ष-

२०१३-१४ : २१३६

२०१४-१५ : १४४४

२०१५-१६ : ४०१५

२०१६-१७ : ९४०

 • १०. विहीर अधिग्रहण-१०-१-१९ एकूण-१०२६ (औरंगाबाद-२९३, जालना-१८७, परभणी-२२, नांदेड-२, बीड-३०३, लातूर-५५, उस्मानाबाद-१६४)
 • ११. आवश्यक चारा व उपलब्धता (०१.१२.२०१८ रोजी पासून) जनावरांची संख्या एकूण-६७.०७ लक्ष (लहान- ११.३६ लक्ष, मोठी-३६.२५ लक्ष, शेळी-मेंढी-१९.४६ लक्ष)
 • प्रतिदिन लागणारा चारा- २६३२९ मे. टन. उपलब्ध चारा- ४१६९३४२ मे. टन, उपलब्ध चारा किती दिवस पुरेल-१५८.
 • जून २०१९ पर्यंत आवश्यक चारा- ५५२९०९० मे. टन. उपलब्ध चाऱ्याप्रमाणे तूट- १३५९७४८ मे. टन.
 • १२. शेतकरी आत्महत्या (१ जानेवारी ते ३१ डिसेंबर २०१८ पर्यंत)
 • एकूण प्रकरणांची संख्या-९४७, पात्र प्रकरणांची संख्या-६०३, अपात्र प्रकरणांची संख्या-२६४
 • चौकशीसाठी प्रलंबित प्रकरणे-८०, मदत देण्यात आलेली प्रकरणे-६०३.
 • १३. मागेल त्याला शेततळे :
 • उद्दिष्ट-३९६००, पूर्ण झालेले शेततळे-३५२१६, राज्याच्या तुलनेत हे प्रमाण ३५ टक्के
 • १४. जलयुक्त शिवार : (निवडलेल्या गावांची संख्या- ६०२३)
 • घेतलेली कामे-४४५६, काढलेला गाळ-७६७.५८ लाख घनमीटर, झालेला खर्च-२०२२ कोटी ७६ लाख
 • १५. नाला सरलीकरण व खोलीकरण : १८६३.६२ किलोमीटर, झालेला खर्च- ५५२ कोटी ६७ लाख
 • १६. जमीन महसुलात मिळालेली सूट : २८ लाख ९५ हजार ८५४, एकूण शेतकऱ्यांची संख्या-३४ लाख ८२ हजार ६४३

 

 

First Published on January 11, 2019 12:58 am

Web Title: drought in maharashtra 27