News Flash

अभयारण्यात प्राण्यांसाठी कृत्रिम पाणवठे, खाद्याची सोय

दुष्काळामुळे सांगलीतील सागरेश्वरमधील उपाययोजना

सागरेश्वर अभयारण्यात वन्य प्राण्यांसाठी तयार करण्यात आलेले कृत्रिम पाणवठे, तर दुसऱ्या छायाचित्रात या पाणवठय़ावर येणारे प्राणी.

|| दिगंबर शिंदे

दुष्काळामुळे सांगलीतील सागरेश्वरमधील उपाययोजना

दुष्काळ आणि पाणीटंचाईच्या झळा आता मुक्या जीवांनाही बसू लागल्या आहेत. सागरेश्वर अभयारण्यातील सांबर, चितळ आदी प्राणी पाण्याच्या शोधात बाहेर पडल्यानंतर भटक्या कुत्र्यांच्या भक्ष्यस्थानी पडण्याच्या घटनांमध्ये वाढ झाली आहे. हे हल्ले टाळण्यासाठी या अभयारण्यात प्राण्यासाठी कृत्रिम पाणवठे तयार करण्यात आले असून त्यामध्ये १२ टँकरने पाणीपुरवठा करण्यात येत आहे. तसेच अन्नसुरक्षा योजनेअंतर्गत ओला मका आणि सहा क्विंटल उडीद, कळणा यांचीही व्यवस्था करण्यात आली आहे.

वाढती उन्हाची तीव्रता आणि त्यातच दुष्काळाचे चटके यामुळे सागरेश्वर अभयारण्यातील प्राण्यांची तळमळ सुरू झाली आहे. या अभयारण्यात सांबर, चितळ, कोल्हा, तरस, ससे, सािळदर, रानडुक्कर आदी प्राण्यांबरोबरच मोर व अन्य पक्षांचे मोठ्या प्रमाणात वास्तव्य आहे. चांदोली अभयारण्यातील वाघांची अन्नसाखळी मजबूत करण्यासाठी या ठिकाणी हरीणवर्गीय प्राण्याची पदास करण्याचे नियोजन आहे.

सागरेश्वर अभयारण्याचे क्षेत्र १ हजार ८७ चौरस हेक्टर असून सध्या तीव्र उन्हामुळे नसíगक पाण्याचे स्रोत आटले आहेत. यामुळे पाण्याच्या शोधात अनेक प्राणी अभयारण्याच्या बाहेर जाण्याचा प्रयत्न करतात. मात्र आजूबाजूच्या शेतात गेल्यानंतर हे प्राणी भटक्या कुत्र्यांचे भक्ष्य बनण्याचा धोका आहे. गेल्या काही महिन्यांत भटक्या कुत्र्यांनी सांबर, चितळांवर असे हल्ले करण्याच्या घटना घडल्या आहेत. हे प्रकार घडू लागताच वनविभागाने संरक्षित क्षेत्रातच कृत्रिम पाणवठे तयार करून पाण्याची व्यवस्था केली आहे.

चांदोली राष्ट्रीय अभयारण्यात वाघांचे अस्तित्व संरक्षित करण्यासाठी नसíगक खाद्य असलेल्या हरणांची पदास सागरेश्वरमध्ये करण्याचे नियोजन आहे. यासाठी वन विभागाचे प्रयत्न सुरू असून हरणांची संख्या वाढल्यानंतर त्या हरणांना चांदोलीच्या जंगलात सोडण्याचे नियोजन आहे. यासाठी येथील हरणांचे संगोपन करण्यासाठी वन विभाग कसोशीने प्रयत्न करीत आहे.

पाण्याबरोबर खाद्याचीही सोय

‘सागरेश्वर’मधील कृत्रिम पाणवठय़ाच्या ठिकाणी एक दिवसाआड १२ टँकरने पाणीपुरवठा करण्यात येत असल्याचे वन विभागाचे कर्मचारी जितेंद्र गुजले यांनी सांगितले. याशिवाय ताकारी सिंचन योजनेच्या कालव्यातून दोन स्वतंत्र जलवाहिन्यांद्वारेही अभयारण्यात पाणी घेण्यात आले असून ते नसíगक खोलगट भागात साठविण्यात येत आहे. तसेच चितळ, सांबर यांना नसíगक गवताची चणचण भासत असल्याने ओला मकाही विविध भागात टाकण्यात येत आहे. तसेच अभयारण्यातील पक्ष्यांसाठी दररोज सहा क्विंटल उडीद आणि कळणा टाकण्यात येत आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on May 12, 2019 1:28 am

Web Title: drought in maharashtra 38
Next Stories
1 हवाई दलात २८ वैमानिकांची तुकडी दाखल
2 वाघांच्या मृत्युनोंदीकडे दुर्लक्ष
3 उद्योग क्षेत्रातील अग्रणी देवेश्वर यांचे निधन
Just Now!
X