मराठवाड्यामध्ये सरासरीपेक्षा कमी पर्जन्यमान झाल्याने अनेक ठिकाणी दुष्काळी परिस्थिती दिसून येत आहे. महसूल प्रशासनाच्या नजर पैसेवारीत मरा’वाड्यातील जवळपास तीन हजार गावांची पैसेवारी ५० च्या आत आली आहे. उर्वरित गावातही जेमतेम स्थिती असल्याने विभागाला सुद्धा दुष्काळाचा सामना करावा लागण्याची शक्यता आहे. अंतिम पैसेवारी १५ डिसेंबरला जाहीर करण्यात येणार असून यानंतर मरा’वाड्याचे चित्र स्पष्ट होईल. मात्र, इतर राज्यातील इतर विभागापेक्षा मरा’वाड्यात सर्वाधिक गावात दुष्काळग्रस्त परिस्थिती असेल असा अंदास प्रशासनाने वर्तवला असून त्याअनुषंगाने विविध उपाययोजनांवर भर देण्यात येत आहे.

विभागातील जिल्हानिहाय ३० सप्टेंबरला जिल्हाधिकाऱ्यांनी नजर पैसेवारी जाहीर केली. यात मरा’वाड्याचा विचार करता एकूण ८ हजार ५३३ गावांपैकी २ हजार ९५८ गावांची पैसेवारी ५० च्या आत तर उर्वरित गावाची पैसेवारी ५० च्यावर असल्याचे अहवाल विभागीय आयुक्त कार्यालयाने अपर मुख्य सचिवास पा’वला आहे. या हंगामी पैसेवारीत सर्वाधिक दुष्काळग्रस्त परिस्थिती औरंगाबाद जिल्ह्यात असल्याचे समोर आले असून एकूण एक हजार ३५५ गावांपैकी एक हजार ३३५ गावातील पैसेवारी ही ५० च्या आत आली असून उर्वरित २० गावातील स्थिती सुद्धा जेमतेम आहे. यासह जालना जिल्ह्यातील एकूण ९७१ गावांपैकी ९५२ ‘िकाणची पैसेवारी ५० च्या आत तर १९ ठिकाणी ५० पेक्षा अधिक आहे. बीड जिल्ह्यातील एक हजार ४०२ गावांपैकी ६७१ गावाची पैसेवारी ५० पेक्षा कमी तर ७३१ गावाची ५० च्यावर आहे. परभणी, हिंगाली, नांदेड, लातूर आणि उस्मानाबाद जिल्ह्यातील सर्व गावांची पैसेवाही ५० पेक्षा अधिक असल्याचे प्रशासनाने जाहीर केले आहे.