तालुक्यातील आदिवासी ग्रामीण भागात असलेल्या चिल्लार नदीमध्ये सहा मित्र पोहण्यासाठी गेले असता त्यातील एक चोवीस वर्षीय तरुण वाहत्या पाण्याचा अंदाज न आल्याने रविवारी दुपारी नदीमध्ये वाहून गेला. त्याचा शोध परवा सायंकाळपासून सर्व यंत्रणा शोध घेत होत्या. तरीही वाहून गेलेल्या तरुणाचा शोध लागला नाही मात्र आज सकाळी दहा वाजता त्या तरुणाचे प्रेत नदीच्या पात्रात सापडले. या घटनेमुळे परिसरातील गावात हळहळ व्यक्त केली जात आहे.

टेंबरे ग्रामपंचायतमधील रजपे गावातील रहिवासी असलेला, सध्या कर्जत भिसेगाव येथे वास्तव्य असलेला सागर तानाजी िपगळे हा आपल्या ठाण्याच्या चार व कर्जत भिसेगावातील एका मित्रासह रविवारी गावाबाहेरून वाहणाऱ्या चिल्लार नदीमध्ये पोहण्यासाठी दुपारी अडीच वाजता घरातून बाहेर पडला. पावसाची संततधार सुरू असल्याने चिल्लार नदीच्या पात्रात मोठय़ा प्रमाणात पाणी वाहत होते.

मात्र स्थानिक असल्याने रजपे गावातील ते सहा तरुण नदीमध्ये पोहत होते. मात्र दुपारी साडेतीनच्या सुमारास नदीच्या पात्रात पाण्याचा मोठा  लोट वाहून आला आणि त्यात सागर िपगळे हा तरुण वाहून गेला. त्याच्या सोबत पोहण्यासाठी गेलेल्या तरुणांनी सागरला शोधण्याचा प्रयत्न केला, मात्र नदीचे पात्र दुथडी भरून वाहत असल्याने सागरच्या मित्रांचा शोध अपुरा पडला. चारच्या सुमारास त्याच्या मित्रांनी रजपे गावात येऊन सागर िपगळे नदीमध्ये वाहून माहिती गावकरी यांना सांगितली. शोकाकुल वातावरणात ग्रामस्थांनी जास्त वेळ न घालवता सरळ चिल्लार नदी गाठली. मात्र नदीच्या पात्रता पाण्याची पातळी दुपारनंतर अधिक जास्त वाढल्याचे सागरसोबत पोहायला गेलेल्या त्याच्या मित्रांनी ग्रामस्थांना सांगितले.

शेवटी सर्व ग्रामस्थ आणि परिसरातील गावातील लोकांनी नदीमध्ये वाहून गेलेल्या सागर तानाजी िपगळे याचा शोध घेण्यास सुरुवात केली होती. ग्रामस्थांनी रजपे गावापासून चिल्लार नदीच्या पात्रात गस्त घालण्यास सुरुवात केली आहे. त्यात काही लोक रजपे गावाच्या पुढे धोत्रे, शिलार, त्याचप्रमाणे पुढे किकवी असा शोध सुरू केला होता. मंगळवारी सकाळी  सागर िपगळेचा शोध सुगवे, गुडवण, अंथरट, काळेवाडी, िपपळोली असा सुरू होता.  पाणबुडय़ांच्या साहाय्यानेसुद्धा शोध केला परंतु काल रात्रीपर्यंत यश आले नाही.

अखेर मंगळवारी सकाळी नदीच्या पात्रात तब्बल ४२ तासांनी सागरचा मृतदेह दिसून आला. त्यानंतर मृतदेहाचे शवविच्छेदन करून तो नातेवाईकांच्या ताब्यात देण्यात आला व त्यावर भिसेगावच्या स्मशानभूमीत मंगळवारी आज दुपारी चारच्या सुमारास अंत्यसंस्कार करण्यात आले.