ठेवीदारांची आर्थिक फसवणूक केल्याप्रकरणी तुरुंगात असलेले बांधकाम व्यावसायिक डी. एस. कुलकर्णी (डीएसके) यांचा मुलगा शिरीष कुलकर्णी अखेर पोलिसांसमोर हजर झाले आहेत. त्यांना न्यायालयात हजर करण्यात आलं असून २ जुलैपर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे. गुंतवणूकदारांची कोट्यवधींची फसवणूक केल्याप्रकरणी पोलिसांनी डी. एस. कुलकर्णी आणि त्यांच्या कुटुंबीयांच्या विरोधात गुन्हे दाखल केले आहेत. या गुन्ह्यात शिरीष कुलकर्णी देखील आरोपी आहेत.

सर्वोच्च न्यायालयाने शिरीष कुलकर्णी यांचा अटकपूर्व जामीन फेटाळला होता. तसंत त्यांना यांनी आठ दिवसात पोलिसांसमोर हजर व्हावे, असा आदेशही दिला होता. याआधी पुणे न्यायालय तसेच उच्च न्यायालयाने शिरीष कुलकर्णी यांचा जामीन अर्ज फेटाळला होता.

Narayan Rane case, Vinayak Raut, Parab,
२००५ नारायण राणेंच्या सभेतील गोंधळाचे प्रकरण : विनायक राऊत, परब, सावंत, देसाई, रवींद्र वायकर यांची निर्दोष सुटका
Journalist Limesh Kumar Jangam arrested for demanding ransom of five lakhs
चंद्रपूर : पत्रकार लिमेशकुमार जंगमला पाच लाखांची खंडणी मागितल्याप्रकरणी अटक
Rameshwar Cafe Bomb blast
Bengaluru: रामेश्वरम कॅफे बॉम्बस्फोट प्रकरणी भाजपा कार्यकर्त्याला अटक, संशयितांशी संबंध असल्याचा दावा
Candidate of Mahavikas Aghadi in Buldhana Constituency Narendra Khedekars candidature application filed
“ही गद्दार विरुद्ध खुद्दार, अशी लढाई”, सुषमा अंधारे कडाडल्या; नरेंद्र खेडेकर यांचा उमेदवारी अर्ज दाखल

मुंबई उच्च न्यायालयाने शिरीष कुलकर्णी यांना १८ जूनपर्यंत मुदत देत पोलिसांसमोर हजर राहण्याचा आदेश दिला होता. यानंतर शिरीष कुलकर्णी यांनी सर्वोच्च न्यायालयात धाव घेतली होती. मात्र सर्वोच्च न्यायालयातही त्यांना दिलासा मिळाला नाही. न्यायालयाने शिरीष कुलकर्णी यांना पोलिसांसमोर हजर होण्यासाठी दिलेली मुदत आज संपत होती. त्यामुळे आज ते पोलिसांसमोर हजर झाले. यानंतर पोलिसांनी त्यांना अटक केली.